Rain Update  Agrowon
हवामान

Stormy Rain : वादळी पावसामुळे दक्षतेचा इशारा

अमोल कुटे

Pune News : नैॡत्य मोसमी वाऱ्यांच्या (मॉन्सून) परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली असतानाच, राज्यात पुन्हा पाऊस सक्रिय झाला आहे. आज (ता. २४) राज्यात वादळी वारे, विजांसह जोरदार पावसाची शक्यता असल्याने कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात दक्षतेचा इशारा (ऑरेंज अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे. राज्यात सर्वदूर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.

परतीचा प्रवास सुरू झाल्याने मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा निवळून गेला आहे. मध्य बंगालच्या उपसागरात समुद्र सपाटीपासून ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. या वाऱ्यांच्या प्रभावामुळे पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरात आज (ता. २४) कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहेत.

पावसाला पोषक हवामान, ढगाळ आकाशामुळे कमाल तापमानात घट होण्याची शक्यता आहे. सोमवारी (ता. २३) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नागपूर येथे राज्यातील उच्चांकी ३५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. अनेक ठिकाणी तापमान तिशी पार असल्याने उन्हाचा चटका तापदायक ठरत आहे. दुपारनंतर वादळी वाऱ्यासह वळीव स्वरूपाचा पावसाने हजेरी लावली आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे.

आज (ता. २४) राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रातील सातारा, कोल्हापूर, तर मराठवाड्यातील बीड, परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यांत जोरदार वादळी वारे, विजांसह मुसळधार पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा (ऑरेज अलर्ट) देण्यात आला आहे. उर्वरित राज्यात विजांसह जोरदार पावसाचा अंदाज असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.

मंगळवारी (ता. २४) राज्यातील पावसाचा अंदाज दर्शविणारा नकाशा. (स्रोत : हवामान विभाग)

मुसळधार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) :

रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड.

जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

मुंबई, ठाणे, नाशिक, जळगाव, नगर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, जालना, धाराशिव, लातूर, यवतमाळ, गडचिरोली.

विजांसह वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) : पालघर, नंदुरबार, धुळे, सांगली, सोलापूर, बुलडाणा, अकोला, वाशीम, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Milk Subsidy : गायीच्या दूध अनुदानात दोन रुपयांची वाढ

Greenfield Expressway : शिरूर ते छत्रपती संभाजीनगर ग्रीनफिल्ड द्रुतगती मार्गास मंजुरी

PM Narendra Modi : भारत जगात सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था : मोदी

Sharad Pawar : सामान्य जनताच सरकारला सत्तेतून खाली खेचेल : पवार

Pune Rain : पुणे जिल्ह्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसाची हजेरी

SCROLL FOR NEXT