Heat Wave Agrowon
हवामान

Maharashtra Weather Update : राज्यात उन्हाचा चटका कायम

Maharashtra Weather News : राज्याच्या बहुतांशी भागातून मॉन्सून परतल्याने राज्यात उष्ण व कोरडे हवामान झाले आहे.

अमोल कुटे

Pune News : राज्याच्या बहुतांशी भागातून मॉन्सून परतल्याने राज्यात उष्ण व कोरडे हवामान झाले आहे. मंगळवारी (ता. १०) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये अकोला येथे राज्यातील उच्चांकी ३६.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. आज (ता. ११) राज्यात उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

तेलंगणा आणि आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यालगत, तसेच पश्चिम बंगालच्या हिमालयाकडील भागात समुद्र सपाटीपासून ३.१ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम आहे. उत्तर प्रदेशपासून आसामपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. लक्षद्विप बेट समूह आणि रायलसीमा भागात चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार झाली आहे.

‘ऑक्टोबर हीट’चा चटका वाढल्याने राज्यात उन्हाची ताप वाढली आहे. राज्यात तुरळक ठिकाणी अंशतः ढगाळ हवामान असल्याने उकाडा कायम आहे. अनेक ठिकाणी पारा ३५ अंशांच्या वर आहे.

सोमवारी (ता. १०) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये अकोला, वर्धा आणि सोलापूर येथे तापमान ३६ अंशांच्या पुढे गेले होते. आज (ता. ११) राज्यात मुख्यतः उष्ण व कोरड्या हवामानाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

मंगळवारी (ता. १०) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील कमाल तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे ३४.०, जळगाव ३५.४, कोल्हापूर ३२.८, महाबळेश्वर २७.१, नाशिक ३३.३, सांगली ३३.८, सातारा ३४.५, सोलापूर ३६.३, सांताक्रूझ ३५.९, डहाणू ३४.२, रत्नागिरी ३२.४, छत्रपती संभाजीनगर ३३.८, नांदेड ३५.२, परभणी ३५.४, अकोला ३६.९, अमरावती ३५.६, बुलडाणा ३४.०, ब्रह्मपुरी ३५.८, चंद्रपूर ३५.४, गडचिरोली ३५.२, गोंदिया ३५.४, नागपूर ३५.४, वर्धा ३६.०, वाशीम ३५.०, यवतमाळ ३५.७.

मॉन्सूनची परतीची वाटचाल सुरूच

नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) सोमवारी (ता. ९) बहुतांश महाराष्ट्रातून काढता पाय घेतला आहे. विदर्भ आणि कोकणाचा काही भाग वगळता संपूर्ण महाराष्ट्रातून मॉन्सून परतला आहे. मंगळवारी (ता. १०) मॉन्सूनची परतीची सीमा कायम होती. मॉन्सूनच्या परतीची वाटचाल सुरू असून, दोन दिवसांत संपूर्ण महाराष्ट्रासह देशाच्या आणखी काही भागातून मॉन्सून परतण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Irrigation Project: आनंदवाडी प्रकल्पाच्या सिंचनक्षेत्रात १०३ हेक्टरने वाढ

Veterinary Services: पशुवैद्यक हे अन्न, आरोग्याचे रक्षक

Fertilizer Dealers Protest: नाशिकमध्ये कृषी निविष्ठा विक्रेत्यांचा कडकडीत बेमुदत बंद

Natural Farming Training: नैसर्गिक शेतीसाठी शेतकरी शाळांचा प्रभावी उपक्रम

Groundwater Recharge: विहिरींचे पुनर्भरण काळाजी गरज! कसे करावे पुनर्भरण?

SCROLL FOR NEXT