Budget 2024 Agrowon
Video

Budget 2024: पीएम किसान योजनेवर अर्थमंत्री निर्मला सितारामन यांचे मौन का?

Nirmala Sitharaman: निधी आयोगाकडून या योजनेचं मूल्यांकन सुरू आहे. त्यामुळं आधीपासून पीएम शेतकरी सन्मान निधी योजना बंद केली जाईल, या चर्चेला हवा मिळालेलीय. त्यात अर्थमंत्र्यांनी या योजनेचा अर्थसंकल्पात उल्लेख न केल्यामुळे या योजनेबद्दल शेतकऱ्यांच्या मनातही संभ्रम निर्माण झालाय.

Team Agrowon

Farmer: शेतकऱ्यांना पीएम किसानमधून दिला जाणारा निधी तुटपुंजा असल्याचं जाणकार सांगतात. त्यामुळं योजनेच्या निधीत वाढ करण्याची सूचना करण्यात आली होती. पण त्याला मात्र अर्थमंत्र्यांनी केराची टोपली दाखवली. केंद्र सरकारनं २ फेब्रुवारी २०१९ रोजी पीएम किसान योजना सुरू केली. या योजनेतून वर्षाला तीन टप्प्यात ६ हजार रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जातात. केंद्र सरकार या योजनेचा उदोउदो करत असतं. लोकसभा निवडणुकांच्या आधी अंतरिम अर्थसंकल्पातही या योजनेच्या लाभार्थीवर जोर देण्यात आला होता. खरं म्हणजे २०१९ साली लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून योजना सुरू केल्याचं जाणकार सांगतात. या योजनेचा लाभ भाजपला २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत झाला होता. परंतु २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत मात्र शेतकऱ्यांनी दणका दिला. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Lalya: कपाशीवर लाल्याचा प्रादुर्भाव? योग्य कारण ओळखूनच करा उपाय

Water Storage Crisis: सांगली जिल्ह्याच्या जलसाठ्यावर संकटाचे ढग

Indian Railways : अहिल्यानगर-बीड रेल्वे प्रवास होणार सुपरफास्ट

Toll Waiver: गणेशभक्तांसाठी आनंदाची बातमी, यंदाही टोलमाफी, पास उपलब्ध

Devlali Danapur Express : देवळाली-दानापूर शेतकरी समृद्धी रेल्वेची १०० वी फेरी पूर्ण

SCROLL FOR NEXT