lemon prices agrowon
Video

Potato Prices: बटाटा आवक स्थिर; तसेच काय आहेत गाजर, लसूण, शेवगा आणि लिंबाचे आजचे बाजारभाव

market rate: आपण आजच्या अॅग्रोवन शेतमार्केट पाॅडकास्टमधून महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत. आज आपण गाजर, लसूण, शेवगा, बाटाटा आणि लिंबू बाजाराची माहिती घेणार आहोत.

Team Agrowon

Carrot price: बाजारात सध्या गाजराला उठाव मिळत आहे. बाजारातील आवक मात्र कमी झाली आहे. सध्या बाजारात गाजर प्रतिक्विंटल सरासरी २ हजार ते २ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान विकले जात आहे. लसणाच्या बाजारात मागील काही दिवसांपासून सुधारणा दिसून आली. लसणाच्या भावात दोन आठवड्यांमध्ये सरासरी ५०० ते १ हजार रुपयांची वाढ दिसून आली. लसणाचे भाव राज्यातील बहुतांशी बाजारांमध्ये सध्या ७ हजार ते ८ हजार रुपये प्रतिक्विंटलच्या दरम्यान होते. बाजारातील शेवग्याची आवक कमीच आहे. त्यामुळे शेवग्याचे भावही तेजीतच आहेत. शेवगा आजही ५ हजार ते ६ हजार रुपये प्रतिक्विंटलच्या दरम्यान विकला गेला. देशात यंदा बटाटा उत्पादन चांगले झाले. बटाट्याला सध्या प्रतिक्विंटल सरासरी १५०० ते २ हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. लिंबाची बाजारातील आवक सुरळीत आहे. मात्र लिंबाला उठाव कमी झाला. सध्या लिंबू ३ हजार ते ४ हजार रुपयाने विकले जात आहे. मागील महीनाभरातच लिंबाचे भाव क्विंटलमागे १ ते २ हजाराने कमी झाले आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Unseasonal Rain Relief GR: अवकाळीग्रस्त ९ जिल्ह्यांतील ६६ हजार शेतकऱ्यांना मोठा दिलासा, ५३ कोटी ७३ लाख मदत मंजूर

Cotton, Soybean Rate: हळदीच्या भावात सुधारणा होण्याचे संकेत आहेत का ?

Village Development: गावच्या विकास निधीसाठी आता ग्रामसेवकांचे प्रमाणपत्र अनिवार्य

Silk Production: ‘महारेशीम अभियाना’ला नांदेड जिल्ह्यात प्रतिसाद: वडवळे

Kharif Season: खरीप पिकांच्या ७० हजार क्विंटल बियाण्यांची मागणी

SCROLL FOR NEXT