Moong urad crop management agrowon
Video

Moong Urad Crop: मूग आणि उडीद पिकाचे व्यवस्थापन कसे करावे?

Moong urad intercropping: खरीप हंगामात मूग आणि उडीद ही अत्यंत उपयुक्त व लाभदायक कडधान्य पिके मानली जातात. ही पिके मुख्य किंवा आंतरपीक म्हणून घेतली जातात. त्यांचा पिकाचा कालावधी कमी म्हणजेच दोन ते अडीच महिने असल्यामुळे अल्पावधीत आर्थिक फायदा मिळतो. बाजारात यांना चांगली मागणी असून दरही समाधानकारक असतात. याशिवाय, या पिकांच्या मुळांवर रायझोबिअम जिवाणूंच्या गाठी तयार होऊन नत्राची उपलब्धता व साठा वाढतो आणि जमिनीत सेंद्रिय घटकांचे प्रमाण वाढून सुपीकता सुधारते.

Team Agrowon

Moong urad farming guide: जमिनीची निवड आणि पूर्व मशागत:

मध्यम ते भारी व पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन निवडावी. क्षारयुक्त, पाणथळ किंवा उतारावरील जमीन टाळावी. पिकाची पूर्व मशागत करताना खोल नांगरट करून पहिल्या पावसाच्या नंतर वखरपाळी घ्यावी. माती भुसभुशीत करण्यासाठी कुळवाच्या २ पाळ्या द्याव्यात. शेवटच्या पाळीपूर्वी प्रति हेक्टर १५-२० गाड्या चांगले कुजलेले शेणखत टाकावे.

पेरणीचा योग्य काळ:

पेरणी मॉन्सूनच्या पहिल्या पावसानंतर व जमीन वाफसा झाल्यावर त्वरित करावी. शक्यतो जूनच्या दुसऱ्या आठवड्यात पेरणी पूर्ण करावी. ७ जुलैनंतर पेरणी टाळावी, कारण पिकाच्या वाढीवर विपरीत परिणाम होतो.

बियाण्याचे प्रमाण व पेरणीचे अंतर:

प्रति हेक्टर १२-१५ किलो बियाण्यांचा वापर करावा. दोन ओळींतील ३० से.मी. व दोन रोपांतील १० सें.मी. अंतर ठेवून पेरणी करावी.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Highest Crop Insurance Claim: वस्तुनिष्ठ कापणी प्रयोगांमुळे राज्यात सर्वाधिक पीकविमा

Zero Tillage: शून्य मशागत खरंच फायदेशीर ठरते का?

Women Farmers: ‘महिला शेतकरी’ म्हणून ओळख मिळण्याची संधी...

Sangli APMC: सांगली बाजार समितीचा निर्णय लांबणीवर

Custard Apple Farming: सीताफळात विपणनासह प्रक्रिया साखळीची गरज

SCROLL FOR NEXT