Cotton Rate Agrowon
Video

Cotton Rate: आगामी काळात कापसाचे भाव कसे राहतील?

Kapus Market : सर्वात महत्वाचे म्हणजे मार्केट सध्या सेंटीमेंटनुसार चालत आहे.

Team Agrowon

International Market: देशातील सध्याची सुधारणा होण्याला प्रमुख्याने काही कारण आहेत. त्यात देशातील कापूस लागवडीचा घटत असलेला टक्का, देशातील कापूस वापर, निर्यातीसाठी येत असलेली मागणी, सरकीचे टिकून असलेले बाजारभाव आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील सुधारणा यामुळे देशातील कापूस दरात सुधारणा झाली आहे. विशेष म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारातील सुधारणा हा महत्वाचा घटक आहे.  आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे वायदे मागील तीन दिवसांमध्ये ४ टक्क्यांनी वाढले. आंतरराष्ट्रीय बाजारातील कापूस वायदे आज सायंकाळी ७५.३४ सेंट प्रतिपाऊंडच्या दरम्यान होते. विशेष म्हणजे ही दरपातळी कापूस वायद्यांनी तीन आठवड्यांनंतर दाखवली. अमेरिकेच्या कापूस निर्यातीत दिसत असलेली सुधारणा, काही भागात कोरडे हवामान आणि कच्च्या तेलाच्या किमतीतील सुधारणा आणि डाॅलरची कमी झालेली किंमत यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सुधारणा दिसत असल्याचे अभ्यासक सांगत आहेत. पण कापसाच्या मागणीत फार मोठी सुधारणा नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यामुळे भावातील सुधारणेवर मर्यादा दिसू शकतात.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Procurement : हमीभावाने सोयाबीन खरेदीसाठी ४७८ केंद्रे

Livestock Census : राज्यात ॲपद्वारे होणाऱ्या पशुगणनेस आजपासून प्रारंभ

Dana Cyclone : ‘डाना’ चक्रीवादळ आज किनाऱ्याला धडकण्याची शक्यता

Fruit Crop Insurance Issue : फळपीक विमा योजनेत बोगस अर्जांचे ‘पीक’

Vidarbha Weather : विदर्भात पावसाला पोषक हवामान

SCROLL FOR NEXT