Control tiwa disease in cows and buffaloes agrowon
Video

Livestock Health Care: गाई, म्हशीमध्ये तिवा आजाराचा प्रसार कसा होतो?

tiwa virus in cattle: तिवा हा गायी-म्हशींमध्ये आढळणारा एक गंभीर आणि महत्त्वाचा विषाणूजन्य आजार आहे. या आजारामुळे जनावरांना ताप येतो, जो चढ-उतार करत राहतो. यासोबतच स्नायूंमध्ये थरथर, कडकपणा, लंगडणे, आणि लसीका ग्रंथी सुजणे अशी ठळक लक्षणे दिसून येतात.

Team Agrowon

tiwa virus symptoms: वासरांमध्ये या आजाराचा प्रादुर्भाव तुलनेने कमी असतो. सहा महिन्यांखालच्या वासरांमध्ये साधारणतः कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. मात्र धष्टपुष्ट आणि जास्त दूध देणाऱ्या जनावरांमध्ये लक्षणे तीव्र स्वरूपात आढळतात. विशेषतः गायीपेक्षा बैलांमध्ये या आजाराचे प्रमाण अधिक दिसते. तिवा हा रॅबडोवायरस कुलातील ‘एफिमिरो’ विषाणूमुळे होतो.

प्रसार कसा होतो?

या विषाणूचा प्रसार मुख्यतः कुलिक्वायडस प्रजातीच्या चावणाऱ्या माशांद्वारे तसेच डासांमुळे होतो.

पावसाळ्यात, थंडीमध्ये किंवा वातावरणात अचानक बदल झाल्यास अशा माशांचा प्रादुर्भाव वाढतो.

तिवा रोगाचा प्रसार प्रामुख्याने माशांमुळे होतो. एखाद्या गावातील एका जनावराला हा आजार झाल्यास, माशांच्या चाव्यांमुळे तो इतर जनावरांमध्ये झपाट्याने पसरतो.

त्यामुळे हा आजार अचानक संपूर्ण परिसरात फैलावण्याची शक्यता वाढते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pune Forest Tourism: पुणे जिल्ह्यातील वनपर्यटनात क्षमता मोठ्या: जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

Kharif Sowing: राज्यात खरीप पेरा अंतिम टप्प्यात

Code of Conduct Violation Case: मोदींवर आचारसंहिता भंगप्रकरणी  कारवाईस आयोगाची टाळाटाळ

Soil Testing: मृद्‌ चाचणी प्रयोगशाळेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

Bacchu Kadu: शेतकरी आत्महत्याप्रश्‍नी ‘सिंदूर यात्रा’ काढणार : कडू

SCROLL FOR NEXT