जमिनीच्या मगदुरानुसार शेवगा लागवडीचे अंतर ठेवावे. 
प्रश्न तुमचे, उत्तरे तज्ज्ञांची

शेवगा लागवड तंत्रज्ञान

कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी

शेवगा लागवड हलक्या ते भारी जमिनीत करता येते. जेथे पावसाचे प्रमाण चांगले आहे अशा ठिकाणी डोंगर उतारावरील हलक्या जमिनीतसुद्धा शेवगा चांगला येतो. 

  •  तमिळनाडू कृषी विद्यापीठाने कोईमतूर-१, कोईमतूर-२, पी.के.एम.-१ आणि पी.के.एम.-२ या लवकर शेंगा येणाऱ्या व भरपूर प्रथिने असलेल्या जाती विकसित केल्या आहेत. या जातीची झाडे ५ ते ६ मीटर उंच वाढतात. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने कोकण रुचिरा ही जात विकसित केली आहे. 
  •  पावसाळ्यापूर्वी जमिनीच्या प्रकारानुसार दोन झाडे आणि दोन ओळींतील अंतर ४ ते ५ मीटर ठेवावे. लागवडीसाठी  ६० सें. मी. लांब, रुंद आणि खोल खड्डे घ्यावेत. बांधावरील लागवडीसाठी दोन रोपांत ३ ते ४ मीटर अंतर ठेवावे. खड्ड्यांमध्ये चांगली माती, कुजलेले शेणखत, २५० ग्रॅम मिश्रखत मिश्रणाने खड्डा भरून घ्यावा. जून-जुलै चांगला पाऊस झाल्यानंतर रोपांची लागवड करावी.
  •  ठिबक सिंचनपद्धतीचा वापर करणे अत्यंत फायद्याचे ठरते.
  • आंबा, चिकू, लिंबू, जांभूळ, आवळा, चिंच व सीताफळाच्या बागेत पहिली ५ ते ६ वर्षे आंतरपीक म्हणून शेवगा लागवड करता येते. सलग पद्धतीने केलेल्या शेवगा लागवडीत सोयाबीन, मूग, उडीद, हुलग्यासारखी आंतरपिके घेता येतात.
  •  - ०२४२६-२४३८६१ कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी

    ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Crop Insurance Claim: पीक विमा क्लेम ११० टक्क्यांवर; नांदेडसाठी ३११ कोटींचा भार

    Solapur Development Works Issues: तीनशे कोटींच्या विकासकामांना ‘ब्रेक’

    Water Scarcity: गढूळ पाण्यावर ग्रामस्थांचा जीव

    Onion Price Crash: कांद्याच्या गोणी बाजारातच सोडून हताश शेतकरी घरी परतले

    Fertilizer Black Marketing: खताच्या काळाबाजाराला घालणार लगाम

    SCROLL FOR NEXT