Agriculture Mechanization Agrowon
टेक्नोवन

Agriculture Mechanization : नवदुर्गांचे कृषी यांत्रिकीकरणाला बळ

Agriculture Implement Bank : शेती हाच मुख्य व्यवसाय असताना केवळ जमीनधारणा कमी असल्याने अनेक शेतकऱ्यांनी साध्या ट्रॅक्‍टरचीही खरेदी केली नव्हती.

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Wardha News : शेती हाच मुख्य व्यवसाय असताना केवळ जमीनधारणा कमी असल्याने अनेक शेतकऱ्यांनी साध्या ट्रॅक्‍टरचीही खरेदी केली नव्हती. गावशिवारातील ही अडचण दूर करण्यासाठी शिवणगावचा महिला समूह पुढे आला.

सावित्रीच्या या लेकींनी आपल्याकडील बचतीसह शासकीय योजनेचे अनुदान घेत गावात पहिल्या अवजारे बॅंकेची उभारणी केली. यातूनच आता गावात कृषी यांत्रिकीकरणाला बळ मिळाले आहे. आलगाव ग्रामपंचायती अंतर्गत शिवणगाव, आलगाव, चिचोली या तीन गावांचा यात समावेश होतो.

('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

यातील आलगावातच ट्रॅक्‍टर आहे. परंतु १५० लोकवस्तीच्या शिवणगावात मुख्य व्यवसाय शेती असला तरी एकही ट्रॅक्‍टर नसल्याने आलगाव येथूनच भाडेतत्वावर शेतीकामी ट्रॅक्‍टर आणला जात होता. दरम्यान, २०१४ मध्ये गावातील महिलांनी एकत्रित येत ‘साथिया’ गटाची बांधणी केली.

या समूहात अध्यक्ष प्रतिभा गेडाम, उपाध्यक्ष उषा दडांजे, सचिव वंदना जुमळे तर सदस्यांमध्ये सुनीता शेळके, शोभा घुगरे, छाया नरांजे, विश्रांती दडांजे, लक्ष्मी दडांजे, नंदा मलगाम, सुकेसनी कांबळे, अलका फरकाडे यांचा समावेश आहे.

महिन्याला १०० रुपयांच्या बचतीचे उद्दिष्ट या समूहाचे होते. उत्पन्नक्षम व्यवसाय करण्याचे प्रयत्न सुरू होते. परंतु काय व्यवसाय असावा, यावर एकमत होत नव्हते.

अखेरीस गावात यांत्रिकीकरणाचा पर्याय नसल्याने अवजारे बॅंक उभारणीचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार २०२२ साली ट्रॅक्‍टरची खरेदी करण्यात आली. बीबीएफ, पेरणी यंत्र, रोटाव्हेटर, नांगर, तिर्री अशा सर्व अवजारांची १५ लाख रुपयांत खरेदी करण्यात आली. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पातून (पोकरा) सात लाख ६१ हजार ३९४ रुपयांचे अनुदान त्यासाठी मिळाले.

अवजारे बॅंकेतील सयंत्र ठेवण्यासाठी शेडची उभारणी केली. सदस्या शेळके यांची जागा जागा त्यासाठी भाडेतत्वावर घेतली. या अवजारे बॅंकेला चांगला प्रतिसाद असल्याने उत्पन्नही चांगले होत आहे. याच उत्पन्नातून नुकतीच ‘व्ही-फॉस’ या अवजाराची खरेदी ३० हजार रुपयांत करण्यात आली.

गावात ट्रॅक्‍टरच नसल्याने शेतीकामी लागणाऱ्या अवजारांचा विषयच नव्हता. दुसऱ्या गावातून ट्रॅक्‍टर व सयंत्र भाडेतत्त्वावर आणली जात होती. हा उत्पन्नाचा चांगला स्त्रोत ठरेल म्हणून आम्ही अवजारे बॅंक उभारणीचा निर्णय घेतला. यातून वर्षाला दीड लाख रुपयांचा नफा होत आहे.
- सुनीता शेळके, सदस्या, ‘साथिया महिला समूह, शिवणगाव, जि. वर्धा.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Monsoon Rain: मराठवाड्यात पावसाचा जोर कमीच; पूर्व विदर्भ आणि कोकणात पुढील ४ दिवस जोरदार पावसाचा अंदाज

Agrowon Podcast: गव्हाचे भाव स्थिरावले; डाळिंब तेजीत, मुग दबावात, केळीच्या दरात वाढ, उडदाचे भाव स्थिर

ZP School Admission : बोराखेडी जिल्हा परिषद शाळेत प्रवेश ‘ॲडमिशन फुल्ल’

Tree Plantation : जैवविविधता जपण्यासाठी वृक्षारोपण गरजेचे

Farmers Welfare: बच्चू कडू यांच्या मागण्यांना सरकारचा सकारात्मक प्रतिसाद; शेतकरी,मजुरांसाठी आश्वासने

SCROLL FOR NEXT