Agriculture Drone Agrowon
टेक्नोवन

Drone : ड्रोनच्या साह्याने बुरशीनाशक फवारणीसाठी सिंजेंटाला मान्यता

रासायनिक किटकनाशके आणि खतांची फवारणी, शेतजमिनींचे सर्वेक्षण करणे, माती आणि पिकाच्या आरोग्यावर लक्ष ठेवणे यासारख्या गोष्टींसाठी ड्रोनचा वापर केला जातोय.

टीम ॲग्रोवन

शेती हे तसे कष्टप्रद काम. त्यातील कष्ट कमी व्हावेत आणि उत्पादकताही वाढावी या दृष्टीने तंत्रज्ञनाच्या माध्यमातून नानाविध पातळ्यांवर प्रयत्न सुरू आहेत. या अनुषंगाने सध्या कृषी क्षेत्रामध्ये भारतात स्वयंचलित हवाई यंत्रणेचा म्हणजे ड्रोनचा वापर (agriculture Drone Use) वाढला आहे.

रासायनिक किटकनाशके (Pesticide Spraying Drone) आणि खतांची फवारणी (Fertilizer Spraying Though Drone), शेतजमिनींचे सर्वेक्षण करणे, माती आणि पिकाच्या आरोग्यावर लक्ष ठेवणे यासारख्या गोष्टींसाठी ड्रोनचा वापर केला जातोय. अशा प्रकारे ड्रोनच्या साहाय्याने किटनाशकांच्या फवारणीसाठी सिंजेंटा कंपनीला केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. अशी मान्यता मिळालेली सिंजेटा ही भारतातील पहिलीच कंपनी ठरली आहे.

यासंबंधीची माहिती सिंजेंटा इंडियाने सोमवारी दिली. धान पिकांचे संरक्षण करण्याच्या उद्देशाने बुरशीनाशक फवारणी करण्यासाठी ड्रोन वापरण्यास केंद्र सरकारची मान्यता या कंपनीला मिळाली आहे. कृषी मंत्रालयाच्या अखत्यारित येणाऱ्या केंद्रीय कीटकनाशक मंडळाने सिंजेंटा कंपनीला ड्रोन वापराची परवानगी दिली आहे. त्यानुसार ड्रोनच्या साहाय्याने भातावर एमिस्टर टॉप हे बुरशीनाशक फवारता येईल. भातावर पडणाऱ्या बुरशीजन्य रोगांसाठी ते उपयुक्त ठरेल, असे कंपनीने म्हटले आहे.

जैविक परिणामकारकता आणि या फवारणीमुळे पीक सुरक्षेला बाधा पोहोचणार नाही, याची खातरजमा केल्यानंतरच सिंजेंटा कंपनीला किटकनाशक फवारणीसाठी मान्यता मिळाली आहे. सिंजेंटा इंडियाचे कंट्री हेड आणि व्यवस्थापकीय संचालक सुशील कुमार यावेळी म्हणाले की, "भारतीय शेतीत ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर ही काळाची गरज आहे. शासनाने योग्य वेळी निर्णय घेऊन फवारणीसाठी ड्रोनचा वापर करण्यास मान्यता दिली आहे. ड्रोनच्या या वापरामुळे कामगार आणि पाणीटंचाईचे मोठे प्रश्न सुटणार आहेत."

पीक संरक्षण विकास (R&D) सिंजेंटा इंडियाचे प्रमुख सुनील कुर्चानिया म्हणले की, "आम्ही भारतातील अग्रगण्य कृषी विद्यापीठांसोबत ड्रोन संशोधनावर काम करत आहोत. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील कापूस, सोयाबीन, भुईमूग, मिरची, तूर, मका, तांदूळ यासारख्या विविध पिकांवर ड्रोनद्वारे फवारणी करता येऊ शकते का याची चाचपणी करीत आहोत." कृषी फवारणीसाठी ड्रोनचा वापर केल्याने खते, कीटकनाशके , हानिकारक रसायने यांच्याशी मनुष्याचा संपर्क कमी होतो, तसेच वेळ आणि खर्चातही बचत होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Insurance: प्रशासनाच्या सूक्ष्मनियोजनामुळे नांदेडला सर्वाधीक पीकविमा

Jal Samruddha Abhiyan: जलसमृद्ध अभियानातील गावांचा विकास आराखडा तयार करा; आमदार पवार

Baliraja Farm Road Scheme: बळीराजा शेत, पाणंद रस्ते योजनेंतर्गत कामांना गती द्यावी : पालकमंत्री पाटील

Mahavistar AI App: अकोला तालुक्यात ‘महाविस्तार एआय’ ॲपबाबत जनजागृती मोहीम

Onion Farmers in Crisis: कांदा उत्पादक शेतकरी संकटात

SCROLL FOR NEXT