Poultry Farming News Agrowon
टेक्नोवन

Poultry Vaccine : कोंबड्यांचे रक्‍तनमुने घेण्यासाठी खास किट विकसित; शेतकऱ्यांचा खर्च वाचणार

सामान्यतः कोंबड्यांमधील राणीखेत या आजाराच्या नियंत्रणासाठी लसीकरण केले जाते. मात्र त्या पूर्वी कोंबड्यांच्या प्रतिकारशक्‍ती तपासली जात नसल्यामुळे नाहक खर्च वाढतो.

Vinod Ingole

Poultry Farming News : कोंबड्यांमध्ये राणीखेत (मानमोडी, न्यू कॅसल) हा आजार सर्वाधिक आढळतो. तो होऊ नये, यासाठी ब्रॉयलर (broiler), गावरान अशा दोन्ही कोंबड्यांना (Chicken) लसीकरण केले जाते. कोंबड्यांना लसीकरण केल्यानंतर वाढलेली प्रतिकारशक्ती सामान्यतः अडीच महिन्यांत कमी होऊ लागते.

त्यामुळे पहिल्या लसीकरणानंतर दोन ते अडीच महिन्यांनी बूस्टर लस देण्याची शिफारस केली जाते. मात्र ॲन्टीबॉडी टायटर (रोग प्रतिकारशक्‍ती) न तपासताच लसीकरण केले जाते. कोंबड्यांमध्ये प्रतिकारशक्ती असताना त्याचा वापर निरर्थक आणि नाहक खर्चिक ठरतो.

ही बाब लक्षात घेता महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या (माफसू) कुक्‍कुटपालन शास्त्र विभागाने कोंबड्यांचे रक्‍त नमुने घेण्याच्या तंत्रामध्ये काही बदल करून छोटेसे किट तयार केले आहे.

असे आहे किट

या किटमध्ये काही फिल्टर पेपर आणि रक्त काढण्यासाठी एक सुईसारखी पिन इतकेच आहे. शेतकरी ही सुई टोचून कोंबडीचे बाहेर येणारे रक्त एका फिल्टर पेपरने शोषून घेतो.

आपल्या फार्ममधील सुमारे पाच टक्के इतक्या कोंबड्यांच्या रक्तांचे फिल्टर पेपर सामान्य वातावरणामध्ये प्रयोगशाळेत पाठवता येतात.

प्रयोगशाळेमध्ये हे फिल्टर पेपर ‘ब्रीज-३५’ किंवा ‘पीबीएस (फॉस्फेट बफर सलाइन)’ या रसायनात टाकले जाता.

त्यानंतर त्यावरील रक्तपेशी पुन्हा मूळ अवस्थेत येतात. त्यांचे विश्‍लेषण आपल्या सामान्य द्रवरूप रक्ताप्रमाणे केल्यानंतर रक्‍तातील प्रतिपिंडांचे (ॲन्टिबॉडीज) प्रमाण मोजता येते.

- ही प्रतिपिंडे प्रमाणित पातळीपेक्षा कमी असल्यास लसीकरणाचा सल्ला दिला जातो.

- जर योग्य प्रमाणात प्रतिपिंडे आढळल्या तर लसीकरणाची आवश्यकता नसते.

- तपासणीसाठी पाच टक्के (म्हणजे १०० पैकी ५) कोंबड्यांचे रक्‍त घेऊन तपासणी केली, तरी आपल्याला व्यवस्थित अंदाज येऊ शकतो.

- या तंत्राला ‘ड्राइड ब्लड स्पॉट टेक्‍निक’ असे म्हणत असल्याचे विभाग प्रमुख डॉ. मुकुंद कदम यांनी सांगितले. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली डॉ. सिद्धार्थ पवार व डॉ. अर्चना पाटील यांनी हे संशोधन केले आहे.

अंडी देणाऱ्या कोंबड्यांमध्ये राणीखेत रोगाच्या नियंत्रणासाठी लसीकरण केले जाते. त्यानंतर निर्माण झालेली प्रतिपिंडे तपासण्यासाठी रक्त संकलनाऐवजी फिल्टर पेपरचा वापर या कीटमध्ये केला आहे. त्याच प्रमाणे व्यावसायिक लेअर फार्ममध्ये रक्त संकलनाऐवजी कोंबडीने दिलेले अंडे प्रयोगशाळेत पाठवले तरी चालते. या अंड्यांच्या पिवळ्या बलकाचा नमुना वापरूनही प्रतिपिंडांची तपासणी करणे शक्य होते. त्यामुळे कोंबडीच्या शरीरात निर्माण झालेल्या प्रतिपिंडाचे प्रमाण आपल्याला जाणून घेणे काहीसे सोपे झाले आहे.
डॉ. मुकुंद कदम, ८८८८८३६३७४

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Hawaman Andaj : राज्यातील गारठा कायम; राज्यातील काही भागातील किमान तापमानात काहिशी वाढ

Maharashtra Assembly Election Result 2024 : राज्यात महायुती सुसाट; भाजप १२, शिंदेसेना ८ आणि अजित पवार गटाचे ८ उमेदवार विजयी

Jowar Sowing : कोरडवाहू क्षेत्रातील ज्वारी पेरणीला गती

Goat Farming : आग्रा येथील राष्ट्रीय चर्चासत्रात अकोल्यातील शेळी उत्पादकाचा सन्मान

Fadnavis, Girish Mahajan, Aditi Tatkare and Rane win : महाराष्ट्रात महायुतीची लाट; फडणवीस, मुंडे, गिरीश महाजन, अदिती तटकरेंसह राणे विजय

SCROLL FOR NEXT