Radio Frequency Technology Agrowon
टेक्नोवन

Radio Frequency Technology : संपूर्ण अंडी निर्जंतुकीकरणासाठी रेडिओ फ्रिक्वेन्सी तंत्रज्ञान!

Egg Sterilization : दररोजच्या नाष्टा आणि जेवणामध्ये समावेश असलेल्या कच्ची अंडी आणि अंड्याच्या पदार्थातून सॅलमोनेल्ला मानवी शरीरात शिरकाव करतो. या समस्येशी लढण्यासाठी अमेरिकन कृषी विभागातील संशोधकांनी रेडिओ फ्रिक्वेन्सी तंत्रज्ञानाचा वापर केला आहे.

Team Agrowon

Technology : अमेरिकेतील ‘सेंटर फॉर डीसिज कंट्रोल अॅण्ड प्रिव्हेन्शन’ या संस्थेच्या अहवालानुसार, अमेरिकेमध्ये दरवर्षी सॅलमोनेल्ला या जिवाणूमुळे १.३५ दशलक्ष लोकांना प्रादुर्भाव आणि २६,५०० लोकांना रुग्णालयात भरती व्हावे लागण्यासोबतच ४२० लोकांचा मृत्यू घडत असल्याचे स्पष्ट होते.

दररोजच्या नाष्टा आणि जेवणामध्ये समावेश असलेल्या कच्ची अंडी आणि अंड्याच्या पदार्थातून सॅलमोनेल्ला मानवी शरीरात शिरकाव करतो. या समस्येशी लढण्यासाठी अमेरिकन कृषी विभागातील संशोधकांनी रेडिओ फ्रिक्वेन्सी तंत्रज्ञानाचा वापर केला आहे.

अन्नातून पसरणाऱ्या रोगकारक घटकांना रोखण्यासाठी कच्च्या अंड्यांचे निर्जंतुकीकरण (पाश्‍चरीकरण) करण्याची आवश्यकता असते. मात्र अमेरिकेमध्ये व्यावसायिक अंडी उत्पादनातील ३ टक्क्यांपेक्षाही कमी अंड्यावर पाश्‍चरीकरणाची प्रक्रिया केलेली असते.

संपूर्ण अंड्यावर केली जाणारी पारंपरिक पाश्‍चरीकरणाची प्रक्रिया दीर्घ आहे. सॅलमोनेल्ला जिवाणूपेशी अकार्यक्षम करण्यासाठी ही अंडी गरम पाण्यामध्ये ५७ मिनिटांपेक्षा अधिक काळ ठेवावी लागतात.

अमेरिकन कृषी विभागाच्या वॅंडमूर येथील पूर्व प्रादेशिक संशोधन केंद्रातील संशोधकांनी अंडी पाश्‍चरीकरणासाठी वैशिष्ट्यपूर्ण औष्णिक तंत्रज्ञानाचा वापर केला असून, त्यामुळे अत्यल्प काळामध्ये सॅलमोनेल्ला पेशी अकार्यक्षम केल्या जातात. अभ्यासामध्ये अंड्याच्या आतील द्रव पदार्थ (पाणी) हे फिरून उपकरणाद्वारे निर्माण केलेल्या रेडिओ फ्रिक्वेन्सीशी (रेडिओ वारंवारिता) समांतर जुळवून घेते.

या प्रक्रियेमध्ये झालेल्या घर्षणामुळे आतील द्रवाचे तापमान वेगाने वाढते. २४ मिनिटांच्या आत सॅलमोनेल्ला च्या ९९.९९९ टक्के पेशी अकार्यक्षम होतात. ही रेडिओ फ्रिक्वेन्सीची प्रक्रिया केलेली अंडी रेफ्रिजरेटरमध्ये हलवली जातात. तिथे ७ अंश सेल्सिअस तापमानामध्ये सात दिवसांसाठी ठेवण्यात आली. म्हणजेच प्रक्रियेनंतर ग्राहकांपर्यंत पोहोचण्यापर्यंतचा शीतसाखळीमधील कालावधी हा सात दिवसांचा ठेवण्यात आला.

या प्रक्रियेविषयी माहिती देताना अन्न तंत्रज्ञ डॅनिएला बर्म्युडेझ- अग्यूइर्रे यांनी सांगितले, की या प्रक्रियेनंतर एकही संपूर्ण सॅलमोनेल्ला किंवा त्यांची हानिकारक ठरू शकेल, अशी पेशी शिल्लक राहत नाही.

तसेच प्रक्रियेनंतर योग्य प्रकारे शीत साखळीमध्ये अंडी ठेवली असता अशा हानिकारक पेशींची पुनर्प्राप्तीही शक्य होत नसल्याचे स्पष्ट झाले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे अंड्याचा दर्जा विशेषतः त्याचा रंग आणि अन्य निकषावरही कोणतेही विपरीत परिणाम दिसून आले नाहीत.

या तंत्रज्ञानाचे फायदे

अन्न उद्योगामध्ये रेडिओ फ्रिक्वेन्सी तंत्रज्ञानाचे भरपूर फायदे दिसून येत आहेत. त्याचे कोणतेही विपरीत परिणाम अन्नाच्या दर्जावर दिसलेले नाहीत. सांख्यिकी शास्त्राच्या आधाराने अमेरिकन लोकांनी २०२३ या वर्षामध्ये ९३.१ अब्ज अंडी आहारामध्ये घेतली आहेत. अंडी उत्पादन घेणारे लहान शेतकरी आणि अंडी प्रक्रिया करणारे उद्योजक यांच्या दृष्टीने सॅलमोनेल्ला जिवाणूंच्या दृष्टीने अंड्याची सुरक्षितता साध्य होणार आहे.

या तंत्रज्ञानाच्या वापरामुळे ग्राहकांच्या आरोग्यासाठी असलेला संभाव्य धोका कमी होण्यास मदत झाली आहे. या तंत्रज्ञानाच्या व्यावसायिक वापरासंदर्भात अधिक अभ्यास आणि संशोधन करण्यात येत आहे. येत्या भविष्यामध्ये तेही लवकरच उपलब्ध होईल, असा दावा संशोधक करत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Procurement Issue : सोयाबीन खरेदीचा तिढा

Green Energy Investment : हरित ऊर्जेमधील गुंतवणूक २५ लाख कोटींवर जाणार

Alandi Kartiki Ekadashi : आळंदीत उद्यापासून माउलींचा संजीवन समाधी सोहळा

Maharashtra Assembly Election : पुणे जिल्ह्यात सर्वाधिक इंदापुरात ७६ टक्के मतदान

Satara Vidhansabha Election 2024 : सातारा जिल्ह्यात चुरशीने ७१.९५ टक्के मतदान

SCROLL FOR NEXT