Chicken Slaughter Unit Agrowon
टेक्नोवन

Chicken Slaughter Unit : ‘माफसू’च्या किरकोळ चिकन स्लॉटर युनिटला पेटंट

मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या पशुवैद्यकीय सामूहिक स्वास्थ्य विभागातील तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली हे संशोधन पूर्ण झाले आहे.

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Poultry Industry Update : चिकनच्या बाजारपेठेत (Chicken Market) असंघटित किरकोळ दुकानदारांचा वाटा ९५ टक्के आहे. मात्र या ठिकाणी अस्वच्छ वातावरणात चिकन विक्री होते.

ही बाब लक्षात घेता महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाने (Maharashtra Animal and Fisheries Science University) स्वच्छ व सुरक्षित चिकन विक्रीसाठी दुकानाचे वेगळे मॉडेल विकसित केले आहे. यास पेटंट देखील मिळाले आहे.

मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या पशुवैद्यकीय सामूहिक स्वास्थ्य विभागातील तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली हे संशोधन पूर्ण झाले आहे. उपयोजनेचे प्रमुख डॉ. विलास वैद्य यांनी दिलेल्या माहितीनुसार, कुक्कुटपालन उद्योगात दरवर्षी आठ ते पंधरा टक्के या दराने वाढ होत आहे.

मागील गणनेच्या तुलनेत देशातील एकूण कोंबड्यांच्या संख्येमध्ये १२.३९ टक्के वाढ नोंदविली गेली. भारतीय ग्राहक किरकोळ बाजारातून ताजे चिकन खरेदी करण्यास प्राधान्य देतात. यामध्ये त्यांच्यासमोरच कोंबडी कापली जाते.

दरम्यान ग्राहक आता स्वच्छ वातावरणात प्रक्रिया केलेल्या स्वच्छ चिकनची मागणी करत आहेत. त्यामुळे किरकोळ चिकन विक्रीसाठी स्वच्छ आणि सुरक्षित दुकानाचे मॉडेल ‘माफसू’ने विकसित केले आहे. यामध्ये चिकन खराब होण्याची शक्यता कमी आहे.

त्यामुळे रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो. तसेच या ‘मॉडेल'ने स्वच्छ चिकन उत्पादनासाठी भारत सरकारच्या अन्नसुरक्षितता आणि भारतीय मानक प्राधिकरणानुसार सर्व आवश्यकता पूर्ण केल्या आहेत.

किरकोळ व्यावसायिकांनी हे युनिट विकत घेतल्यास स्थानिक महानगरपालिका दुकानांच्या नोंदणीसाठी कोणतीही अडचण नाही, असा दावा डॉ.वैद्य यांनी केला आहे.

पशुवैद्यकीय सामूहिक स्वास्थ्य विभाग योजनेचे प्रमुख रवींद्र झेंडे, उपयोजना प्रमुख डॉ. विलास वैद्य, माजी कुलगुरू डॉ. आशिष पातुरकर, दिनेश चव्हाण यांनी या संशोधनामध्ये योगदान दिले आहे.

किरकोळ चिकन स्लॉटर युनिटची लांबी आठ फूट, रुंदी दोन फूट आणि उंची तीन फूट आहे. या युनिटमध्ये स्टेनलेस स्टीलचा वापर करण्यात आला आहे. दीड ते पावणेदोन लाख रुपयांमध्ये हे युनिट तयार होते.
डॉ.विलास वैद्य,९९६७२८०५७७ ,पशुवैद्यकीय सामूहिक स्वास्थ विभाग, उपयोजना प्रमुख, माफसू.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Relief: नाशिकसह तीन जिल्ह्यांतील १ लाख ४५ हजार शेतकऱ्यांना दिलासा, ८६ कोटी ६५ लाख मदत मंजूर

Agri University Research : कृषी विद्यापीठाची संशोधनात ओळख अधिक बळकट होईल

Ring Road Project : रिंग रोड बाधितांचा शासनाविरोधात एल्गार

Murrah Buffalo Subsidy: मुऱ्हा म्हैस खरेदीसाठी ‘चितळे’ देणार अनुदान

Kisan Credit Card : किसान क्रेडिट कार्ड, पशू किसान क्रेडिट कार्डातील अडचणी सोडवा

SCROLL FOR NEXT