टीम ॲग्रोवन
कुपोषणावर मात करण्यासाठी ही वडी उपयुक्त ठरणार असल्याचं या शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. या वडीची शेल्फ लाईफ तीन ते सहा महिने असेल.
भारताच्या पूर्व भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली की बऱ्याचदा भाजीपाल्याचा तुटवडा निर्माण होतो.
अशा स्थितीत लोकांना पोषक आहार मिळणं लांबची गोष्ट. ही बाजू विचारात घेऊन लोकांना कमी खर्चात प्रथिनयुक्त आहार उपलब्ध होण्यासाठी हा संशोधन प्रकल्प सुरू करण्यात आला.
प्रथिनांची उपलब्धता वाढविण्यासाठी चिकनसोबत वडी मऊ करण्यासाठी पेठा, सोयाबीन, कडधान्यांची डाळ असे घटक योग्य प्रमाणात मिसळलेले आहेत.
या वडीला चव येण्यासाठी गरम मसाल्यांचा वापर करण्यात आला आहे. साधारण तापमानाला ही वादी तीन ते सहा महिने टिकते.
ही वडी तयार करण्यासाठी कमी अंडी देणाऱ्या कोंबड्या तसेच अंडी न देणाऱ्या देशी तसेच लेअर कोंबडीच्या चिकनपासून प्रक्रिया उत्पादन विकसित करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे यातून कुक्कुटपालकांच्या उत्पन्नवाढीसाठी प्रयत्न करण्यात येणार आहे.
याविषयी डॉ.जयदीप रोकडे सांगतात, शेतकरी अंडी देणाऱ्या देशी आणि लेयर कोंबड्यांचे संगोपन करतात.