Nashik News : उत्तर महाराष्ट्रात नाशिक, धुळे व नंदुरबार जिल्ह्यांत भात उत्पादन घेतले जाते. त्यानुसार ‘खरीप हंगाम-२०२३’ मध्ये नाशिक विभागातील ९ भात उत्पादक तालुक्यांत सरासरी क्षेत्राच्या किमान २५ टक्के क्षेत्रावर एसआरटी पद्धतीने भात लागवड करण्याचे नियोजन केले आहे. त्यानुसार तीनही जिल्ह्यांत लक्ष्यांक देण्यात आले आहे.
‘‘नाशिक विभागात १ लाख २९ हजार हेक्टर भात लागवडीचे सरासरी क्षेत्र आहे. त्यापैकी किमान ३० हजार हेक्टरवर नियोजन केले आहे. तर कमाल ६० हजार हेक्टर क्षेत्रापर्यंत नेण्याचा प्रयत्न आहे. विभागातील ९ तालुक्यांत २८१ कृषी सहायक आहेत.
त्यांना प्रत्येकी गाव २० हेक्टर मर्यादेत प्रत्येक कृषी सहायकास १०० हेक्टरप्रमाणे २८ हजार १०० हेक्टर, तर ९ आत्मा तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापकांना प्रत्येकी २० हेक्टर, प्रत्येक कृषी सहायकास प्रत्येकी १०० हेक्टरप्रमाणे ९०० हेक्टर अशी २९ हजार हेक्टरवर लक्ष्यांक देण्यात आला आहे,’’ असे विभागीय कृषी सहसंचालक मोहन वाघ यांनी सांगितले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे २२ मे २०२३ रोजी ‘एसआरटी शेतकरी कृषी सन्मान सोहळा’ कार्यक्रमासाठी सगुणा बाग (नेरळ, ता. कर्जत, जि. ठाणे) येथे उपस्थित होते. त्यानंतर त्यांनी राज्यस्तरीय खरीपपूर्व आढावा सभेत भात उत्पादकांसाठी एसआरटी तंत्रज्ञान खरीप हंगामामध्ये अधिकाधिक भात उत्पादकापर्यंत पोहोचविण्याच्या सूचना दिल्या.
चंद्रशेखर भडसावळे यांनी विकसित केलेल्या या पद्धतीचा प्रचार करावा. लागवडीचे प्रात्यक्षिके केली जातील. त्यामध्ये भात लागवड करण्यासाठी लागणारा साचा हा स्थानिक पातळीवर उपलब्ध बांबू, लाकडापासून बनवावा, असे सूचित करण्यात आले आहे.
कामाचा घेतला जाणार आढावा :
कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षकांनी राबविण्यात येणाऱ्या सर्व प्रात्यक्षिकांचे पिकाच्या वाढीच्या अवस्थेत वेळोवेळी दस्तऐवजीकरण करावे. दर आठवड्यास उपविभाग स्तरावरून प्रगतीचा आढावा घ्यावा. विभागस्तरावरून संबंधित मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी व उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांची दरमहा ऑनलाइन सभा घेऊन आढावा घेतला जाईल.
तालुकानिहाय भात लागवड नियोजन
तालुका...कृषी विभाग (हेक्टर)...आत्मा(हेक्टर)
दिंडोरी...३,७००...१००
इगतपुरी...३,३००...१००
पेठ...२,३००...१००
त्रंबकेश्वर...३७००...१००
नाशिक...१,२००..१००
सुरगाणा...३,६००...१००
कळवण...१,२००...१००
नवापूर...४,८००...१००
साक्री...४३०० २००
एकूण...२८,१००...९००
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.