Ragi Kurkure
Ragi Kurkure Agrowon
टेक्नोवन

एक्सट्रूजन कुकिंग तत्रंज्ञानाद्वारे नाचणीचे कुरकुरे

टीम ॲग्रोवन

डॉ. अभिमान सावंत, संदीप कळसे

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने (Dr. Balasaheb Sawant Agriculture University) भारतीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाच्या (Ministry Of Food Processing) संयुक्त विद्यमाने नाचणीपासून कुरकुरे (Ragi Kurkure) करण्याचा महत्वकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पांतर्गत नाचणी पॉलिशर (Ragi Polisher), रिबन मिक्सर, वाळवणी यंत्र आणि एक्सट्रुडर हे यंत्र आणि प्रक्रियेचे तंत्रज्ञान वापरून नाचणीपासून कुरकुरे बनविण्याचे तंत्रज्ञान विकसित केले आहे.

पॉलिशर ः

हे यंत्र विद्युत ऊर्जेवर चालते. या यंत्राच्या साहाय्याने नाचणीला पॉलिश केले जाते. पॉलिशमुळे धान्यावरील पापुद्रा (थर) निघण्यास मदत होते, नाचणी स्वच्छ केली जाते.

नाचणी पॉलिशर

रिबन मिक्सर ः

  • - कुरकुरे बनविण्यासाठी नाचणी बरोबर इतर तृणधान्ये, कडधान्यांचा योग्य प्रमाणात वापर करता येतो.

  • - नाचणी पीठ, मक्याचे पीठ, तांदळाचे पीठ योग्य त्या प्रमाणात घेऊन रिबन मिक्सरमध्ये भरले जाते.

  • - यंत्रामध्ये वेगवेगळ्या धान्यांचे पीठ एकत्र केले जाते. यामुळे मिश्रण एकजीव व समप्रमाणात मिसळते.

  • - यंत्राच्या साह्याने सर्व घटक धान्यांच्या पिठामध्ये ओलावा मिसळण्याचे काम केले जाते.

  • - कुरकुरे तयार करण्यासाठी पिठामध्ये १८ ते २० टक्के ओलावा असणे आवश्यक आहे. परंतु मिश्रणामध्ये जर ओलावा कमी असेल तर त्यामध्ये योग्य प्रमाणात पाणी मिसळले जाते.

  • - हे मिश्रण १८ ते २० टक्के ओलाव्यापर्यंत आणले जाते. यंत्राच्या साहाय्याने हे मिश्रण लवकरात लवकर तयार करता येते. तयार केलेल्या मिश्रणामध्ये पिठाच्या गाठींचे प्रमाण कमीत कमी असते. तयार झालेले मिश्रण स्टेनलेस स्टीलच्या गाळणीमध्ये गाळले जाते. जेणेकरून मिश्रणातील गाठी कमी करता येतात.

रीबन मिक्सर

ट्वीन स्क्रू एक्सट्रुडर ः

  • - रिबन मिक्सर यंत्रामध्ये तयार झालेले मिश्रण ट्वीन स्क्रू एक्सट्रुडरमध्ये घेतले जाते. या यंत्रामध्ये दोन स्क्रू अशा पद्धतीने बसवलेले असतात की, त्यामधील अंतर हळूहळू कमी केले जाते. त्याचवेळी बाहेरील बाजूने विद्युत हिटर बसवलेले असतात. त्यामुळे तेथील तापमान वाढत जाते. या हिटरचे तापमान आपणास पाहिजे तेवढे कमी जास्त करता येते.

  • - या यंत्रामध्ये फिडर स्क्रू, ट्वीन स्क्रू, विद्युत हिटर, कटर या सर्वांचे नियंत्रण हे नियंत्रण फलकावरील वेगवेगळ्या बटनच्या साह्याने केले जाते.

  • - सर्वसाधारणपणे मका, नाचणी, तांदूळ यांचे पीठ योग्य प्रमाण घेऊन मिश्रणापासून कुरकुरे तयार करण्यासाठी योग्य तापमान ठेवले जाते. फिडर स्क्रूच्या साह्याने मिश्रण ट्वीन स्क्रू मध्ये पाठवले जाते. तेथे ते योग्य त्या दाबाने आणि योग्य त्या तापमानामुळे शिजवले जाते. लगेचच त्यांच्यापासून कुरकुरे बाहेर पडतात. बाहेर पडलेले कुरकुरे आपण कटर ब्लेडच्या साहाय्याने तुकडे करू शकतो.

  • - यामध्ये वेगवेगळ्या रंगाचे कुरकुरे तयार करता येतात. तयार झालेल्या कुरकुऱ्यास मसाला, मीठ, टोमॅटो सॉस बाहेरील बाजूस लावले जाते. त्यानंतर कुरकुरे वाळवणी यंत्रामध्ये वाळवण्यासाठी ठेवतात.

ट्वीन स्क्रू एक्सट्रुड यंत्र

वाळवणी यंत्र ः

  • - ट्वीन स्क्रू एक्सट्रुडर यंत्रामध्ये तयार झालेल्या कुरकुरे योग्य मसाला

  • लावून वाळवणी यंत्रात वेगवेगळ्या ट्रे मध्ये ठेवतात.

  • - यंत्रात १० ट्रे असून त्यामध्ये एकावेळी १० किलो कुरकुरे ठेवता येतात. वाळवणी यंत्राचे तापमान नियंत्रित करता येते. साधारणपणे ७० अंश सेल्सिअस तापमानातकुरकुरे १० ते १५ मिनिटे वाळविण्यासाठी ठेवतात. यामुळे तयार झालेले कुरकुरे एकदम खुसखुशीत होतात.

  • - तयार झालेले कुरकुरे आपण आकर्षण पॅकमध्ये पॅकिंग करून साठवू शकतो.छोटे एक्सट्रुड यंत्र

छोटे एक्सट्रुड यंत्र

तामिळनाडू कृषी विद्यापीठाने छोटे एक्सट्रुड यंत्र तयार केले आहे. याची किंमत १.५० लाख रुपये आहे. घरगुती स्तरावर नाचणीचे मूल्यवर्धन करण्यास हे यंत्र उपयोगी आहे.

विविध पिठांचा वापर ः

  • - नागली कुरकुरे बनवण्यासाठी मका व तांदूळ यांचे योग्य मिश्रण लागते. मक्यामुळे स्टार्च उपलब्ध होते. त्यामुळे कुरकुरे तयार होण्यास मदत होते.

  • - नाचणी बरोबर बाजरी, ज्वारी, कुळीथ, तांदूळ, वरी इत्यादी तृणधान्य वापरून उत्तम प्रकारचे कुरकुरे तयार करता येतात. कुरकुरे तयार केल्यामुळे तृणधान्याचे मूल्यवर्धन होते. तसेच आपणास हवी असलेली धान्यातील पोषण मूलद्रव्ये सहजासहजी उपलब्ध होतात.

  • - नाचणीचे कुरकुरे तयार करण्यासाठी रिबन मिक्सर, ट्वीन स्क्रू एक्सट्रुडर आणि ड्रायर यंत्राच्या खरेदीसाठी २५ लाख खर्च येतो. तमिळनाडू कृषी विद्यापीठाने छोटे एक्सट्रुडर यंत्र तयार केले आहे. याची किंमत १.५० लाख रुपये आहे. घरगुती स्तरावर नाचणीचे मूल्यवर्धन करण्यास हे यंत्र उपयोगी आहे.

संपर्क ः ०२३५८ -२८२७२१

(कृषी प्रक्रिया अभियांत्रिकी विभाग, कृषी प्रक्रिया आणि अभियांत्रिकी तंत्रज्ञान महाविद्यालय, दापोली, जि. रत्नागिरी)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Animal Vaccination : पावसाळ्यापूर्वी जनावरांचे लसीकरण करा

Summer Sowing : दुष्काळी छायेतही २४ हजार हेक्टरवर पेरा

Summer Sowing : यवतमाळच्या शेतकऱ्यांची उन्हाळी तिळाला पसंती

Onion Export Policy : अस्थिर कांदा धोरणांचे उमटणार राजकीय पडसाद

Onion Export : कांदा निर्यात खुली; मात्र अटी, शर्थींचा खोडा

SCROLL FOR NEXT