Seed Verity 
टेक्नोवन

गहू तांदूळ, कारळासह ओट्सच्या नव्या जाती विकसित

मध्य प्रदेशातील जबलपूर येथील राज्य संचलित कृषी विद्यापिठाने ओट्स, गहू, तांदूळ आणि कारळ या पिकांचे नवे वाण विकसित केले आहेत. या नव्या वाणांचे वैशिष्ट्ये म्हणजे याचे उत्पादन इतर राज्यातही घेता येणार आहे.

टीम ॲग्रोवन

वृत्तसेवा - मध्य प्रदेशातील जबलपूर येथील राज्य संचलित कृषी विद्यापिठाने (Agri University) ओट्स, (Oats) गहू (Wheat) तांदूळ (Rice) आणि कारळ (Niger) या पिकांचे नवे वाण विकसित केले आहेत. या नव्या वाणांचे वैशिष्ट्ये म्हणजे याचे उत्पादन इतर राज्यातही घेता येणार आहे. जवाहरलाल नेहरू कृषी विद्यापिठाने (Jawaharlal Nehru Agri University) गहू, ओट्स या पिकांच्या प्रत्येकी दोन, तांदळाची एक आणि कारळ्याच्या तीन जाती विकसित केल्या आहेत. ज्याला केंद्राने मान्यता दिली आहे, असे विद्यापिठाचे कुलगुरू (Vice Chancellor) डॉ. पी. के. बिसेन (Dr. P.K. Bisen) यांनी सांगितले आहे.

हेही वाचा - उसाच्या वाड्यावर नेमका अधिकार कुणाचा? केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाने (Ministry Of Agriculture And Farmers Welfare) या संदर्भात ३ जानेवारी रोजी अधिसूचना जारी केली असल्याचेही बिसेन म्हणाले आहेत. "या पिकांच्या नविन वाणांचे बियाणे (New Verity Seed) लवकरच शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिले जाणार आहे. यामुळे दर्जेदार उत्पादनासोबत शेतकऱ्यांचे उत्पन्नही वाढेल", असा विश्वास बिसेन यांनी व्यक्त केला आहे.

या नविन वाणांची गेल्या तीन वर्षांच्या कालावधित ज्या राज्यांमध्ये या पिकांचे उत्पादन घेतले जाते, अशा सर्व ठिकाणी विविध वातावरणाच्या (Climate) परिस्थितींमध्ये याच्या चाचण्या घेण्यात आल्या आहेत, असे विद्यापिठाचे संशोधन सेवा संचालक डॉ. जी. के. कौटू यांनी सांगितले. या नविन वाणांमध्ये उच्च धान्य उत्पादन, रोग प्रतिकारक शक्ती, गुणवत्ता आणि कमी कालावधित कापणी हे याचे विशेष गुणधर्म आहेत. ओट्सच्या दोन वाणांपैकी JO 05-304 हे वाण महाराष्ट्रासह गुजरात, छत्तीसगड, मध्यप्रदेश आणि राजस्थानमध्ये उत्पादनासाठी योग्य आहेत. तर, JO 10-506 या वाणाचे ओडिशा, बिहार, झारखंड, उत्तर प्रदेशचा पूर्वेकडील भाग, आसाम आणि मणिपूरमध्ये केले जाऊ शकते. तर गव्हाच्या MP 1323 व MP 1358 आणि तांदळाची JR 10 वाणाचे उत्पादन मध्य प्रदेशातील विशिष्ठ भागात घेतेले जाऊ शकते. कारळाच्या JNS 521, JNS 2015-9 आणि JNS 2016-115 या तीन जाती मध्य प्रदेश आणि छत्तीसगडच्या सिंचन आणि बिगर सिंचन क्षेत्रासाठी योग्य आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT