Insect Trap Technology Agrowon
टेक्नोवन

Insect Trap Technology : कीटक सापळा तंत्रज्ञानाने खर्चात बचत, गुणवत्तेत वाढ

जळगाव जिल्ह्यातील मंगरूळ (ता. चोपडा ) येथील कांतिलाल भोमराज पाटील यांनी अल्पखर्चात किडींवर नियंत्रण ठेवणारा ‘इकोपेस्ट ट्रॅप’ (सापळा) तयार केला. स्वतःच्या शेतात वापरण्यासह अन्य शेतकऱ्यांपर्यंतही हे तंत्रज्ञान पोहोचवण्यात पाटील यशस्वी झाले आहेत. त्यातून एकात्मिक कीड व्यवस्थापनाला चालना मिळण्यासह शेतकऱ्यांच्या फवारणी खर्चात बचत, शेतीमालाच्या गुणवत्तेत वाढ होण्याचे फायदे मिळाले आहेत.

मुकूंद पिंगळे

कीडनाशकांच्या (Pesticide) अनियंत्रित वापरामुळे शेतमालात रासायनिक अंश आढळण्याची समस्या तयार झाली आहे. किडींमध्ये (Crop Pest) प्रतिकारशक्तीही वाढली आहे. अशा समस्यांवर मात करण्यासाठी जळगाव जिल्ह्यातील मंगरूळ (ता. चोपडा) येथील कांतिलाल भोमराज पाटील यांनी ‘इकोपेस्ट ट्रॅप’ (सापळा) (Ecopest Trap) विकसित केला. पाटील यांची १७ एकर शेती असून, त्यात विविध भाजीपाला पिके (Vegetable Crop), केळी, कलिंगड, खरबूज आदी पिके आहेत. सन २०१४ पासून ते आपल्या शेतात या सापळ्याचे प्रयोग करून त्यातील निरीक्षणे नोंदवत होते. सापळ्यात टप्प्याटप्प्याने सुधारणा करीत सन २०१८ मध्ये त्यांनी त्यास अंतिम रूप दिले.

...असा आहे ‘इकोपेस्ट ट्रॅप’

-प्रकाश व चिकट सापळा असे संयुक्तरीत्या कार्य. पिवळ्या व निळ्या रंगाचे शीटही वापरता येते.-यात दिवसा रसशोषक किडींमध्ये पांढरी माशी, तुडतुडे, फुलकिडी, मावा तर रात्री गुलाबी बोंड अळी, अमेरिकन बोंड अळी, वांग्यावरील शेंडा व फळ पोखरणारी अळी, कोबीवरील अळी आदी विविध किडींचे पतंग ‘ट्रॅप’ होतात.-रंगीत मोठी कार्डशीट व त्यावर दुसऱ्या शीटचे छप्पर असा त्याचा आकार.-सोबत इलेक्ट्रॉनिक सर्किट, ०.५ वॅटच एलईडी दिवा. दोन पेन्सिल सेल. सुमारे २५ दिवस ते कार्यरत राहतात. यात सेन्सर असल्याने दिवा दिवसा बंद राहतो. अंधार पडल्यानंतर तो प्रकाशित होऊन कार्य सुरू करतो. -प्रति सापळा दर- २०० रुपये. -मित्र कीटकांना हानी पोहोचणार नाही, असेही प्रयत्न वा बदल करण्यात आले आहेत.

शेतकऱ्यांत प्रसार

कांतिलाल यांनी आतापर्यंतच्या कालावधीपर्यंत सुमारे वीसहजार सापळे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविल्याचे सांगितले. नाशिक जिल्ह्यातील पिंगळवाडे (ता. सटाणा) येथील रोहिदास संजय भामरे यांची तीन एकर शेती आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे द्राक्षाऐवजी त्यांनी मिरची, कोबी, टोमॅटो, गिलके, कारले, कलिंगड अशी पिके घेण्यास सुरुवात केली. आज ते कीडनिहाय रंगीत चिकट सापळे, कामगंध सापळे यांचा वापर करतातच. त्याशिवाय तीन वर्षांपासून ‘इकोपेस्ट ट्रॅप’ चाही वापर त्यांनी सुरू केला आहे.

त्यांना झालेले फायदे

१) रसशोषक किडींसह कोबीवरील चौकोनी ठिपक्यांचा पतंग, मिरचीवरील अळीचा पतंग, तसेच वेलवर्गीय पिकांतील फळमाशीवर नियंत्रण ठेवणे सोपे झाले. वेळेवर सापळे शेतात उभारल्याने मादीची संख्या कमी होऊन अंडी व त्यापासून होणारे किडींचे पुढील उत्पादन थांबले.

२) कीटकनाशक फवारण्यांची संख्या व त्यावरील खर्चात मोठी बचत झाली. (सुमारे सात ते दहा हजार रुपयांपर्यंत)

३) उत्पादनात ३० ते ३५ टक्के सुधारणा झाली. फळांची गुणवत्ता वाढली. चालू दरापेक्षा किलोला ३ रुपये अधिक दर मिळाला.

४) पावसाळ्यात फवारणी करण्यात अडचणी येतात. अशावेळी सापळा कार्यान्वित राहून कीड नियंत्रणास मदत करतो.

५) हाताळणी व वापर सोपा

६)प र्यावरणाशी समन्वय साधून किडींची संख्या आर्थिक नुकसान पातळीखाली ठेवणे शक्य.

मोरे यांचा अनुभव

चालू वर्षी तीन एकरांमध्ये २५ जून रोजी टोमॅटो लागवड केली होती. त्यावर टूटा अळीचा अधिक प्रादुर्भाव होता. तो जुलै व ऑगस्ट महिन्यात अधिक दिसून आला. एकात्मिक कीड व्यवस्थापनावर भर देताना जुलै अखेर ‘इकोपेस्ट ट्रॅप’ व कामगंध सापळेही उभारले. झालेल्या परिणामांमुळे चांगल्या प्रकारे किडींचे नियंत्रण झाले. फवारणीचा ३० ते ४० टक्के खर्च कमी झाला.

मधुकर मोरे, प्रयोगशील शेतकरी, मोरेनगर, ता. सटाणा

९७६६८३८२६१

वांगी व डाळिंबातील अनुभव

कांतिलाल सांगतात की भाजीपाला व कापूस आदी पिकांत किडींवर नियंत्रणासाठी एकरी ५ ते ७, तर सर्वेक्षणासाठी एक ते दोन सापळे उपयोगी ठरू शकतात. डाळिंब, द्राक्ष आदी बागांमध्ये झाडांच्या कॅनॉपीत त्यांचा वापर करता येतो. सोलापूर भागातील एका शेतकऱ्याने डाळिंबातील खोडकिडीचे पतंगही या सापळ्यात अडकल्याचे कळवले असल्याचे कांतिलाल म्हणाले. वांग्यावरील शेंडा व फळ पोखरणाऱ्या अळीचेही नियंत्रण झाल्याचा अनुभव आल्याचे ते म्हणाले.

कृषी संशोधन संस्थांकडून दखल

महात्मा फुले कृषी विद्यापीठ (राहुरी) व कृषी विज्ञान केंद्र, ममुराबाद (जळगाव) यांच्या वतीने आयोजित ‘कृषी यांत्रिकीकरण दिवस’ निमित्ताने प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. त्यात ‘नवोन्मेश संशोधक शेतकरी’ पुरस्काराने कांतिलाल यांचा सन्मान झाला आहे. सन २०१८ मध्ये अटारी (पुणे) व कृषी विज्ञान केंद्र, नारायणगाव (पुणे) येथे प्रयोगशील शेतकरी तसेच वीर नर्मदा साऊथ गुजरात विद्यापीठ यांच्या वतीने आयोजित राष्ट्रीय परिसंवादात सादरीकरण करण्याची संधी कांतिलाल यांना मिळाली.

त्यांनी केंद्र सरकारच्या मुंबई येथील कार्यालयाकडे ‘पेटंट’ साठी अर्ज दाखल केला आहे. त्यासंबंधित संशोधन प्रसिद्धही झाले आहे. सन २०१९ मध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठात या सापळ्याच्या चाचण्या घेण्यात आला. त्याचे परिणाम सकारात्मक आढळल्याचा अहवाल प्राप्त झाल्याचे कांतिलाल यांनी सांगितले.

‘ॲग्रोवन’ची प्रेरणा

आपण विकसित केलेल्या कीटक सापळ्यामागे ‘ॲग्रोवन’चीच प्रेरणा असल्याचे कांतिलाल सांगतात. पूर्वी भाजीपाला पिकांत रासायनिक कीटकनाशकांचा वापर करायचो. तरीही प्रभावीपणे कीड नियंत्रणास येत नव्हती. ॲग्रोवनमध्ये चिकट व प्रकाश सापळ्यांविषयी सातत्याने माहिती वाचावयास मिळाली. त्यातून स्वतः सापळा तयार करण्याची कल्पना सुचली व तो विकसित केला असे त्यांनी सांगितले.

संपर्क : कांतिलाल पाटील- ९४०५६६९४६१

रोहिदास भामरे- ९२८४४५८०४८

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton, Soybean Rate : कापूस, सोयाबीन, कांदा कुणाची बत्ती गूल करणार? कुणाला फायदा होणार? उद्या होणार उघड

ST Bus : एसटी महामंडळाच्या पन्नास टक्के फेऱ्या रद्द

Chana Cultivation : डहाणूत हरभरा लागवडीवर भर

La Nina Development : ला निना पुढच्या महिन्यात येणार? डिसेंबर ते फेब्रुवारीच्या दरम्यान निर्मितीचा अपेक हवामान केंद्राचा अंदाज 

Solapur Assembly Voting : वाढलेला एक टक्का कोणाच्या पारड्यात पडणार?

SCROLL FOR NEXT