Lemon Grading Machine Agrowon
टेक्नोवन

Lemon Grading Machine : लिंबू प्रतवारीसाठी हस्तचलित यंत्र

Lemon Farming : हस्त चलित लिंबू प्रतवारी यंत्राचा वापर केल्यास वेळ आणि पैसा दोन्हीची बचत होऊ शकते. हे हस्तचलित लिंबू प्रतवारी यंत्र घरच्याघरी तयार करता येते.

Team Agrowon

Grading Machine: उन्हाळ्यात लिंबाला चांगली मागणी असते.  त्यामुळे लिंबू लागवडीमध्ये शेतकऱ्यांचा कल वाढत आहे. लिंबू हे फळ कमी खर्चात जास्त उत्पादन देणारे फळपीक आहे.

बाजारात आकाराने मोठ्या आणि रसरसशीत लिंबाला मागणी असते. लोणचे, सरबत, ज्यूस, रस तयार करण्यासाठी लिंबाला बाजारात मागणी असते.

लिंबू फळाच्या वापरानुसार फळांची प्रतवारी करावी लागते. आकारानुसार त्याची प्रतवारी करणं थोडसं खर्चिक आणि वेळखाऊ काम आहे.

हस्त चलित लिंबू प्रतवारी यंत्राचा वापर केल्यास वेळ आणि पैसा दोन्हीची बचत होऊ शकते. हे हस्तचलित लिंबू प्रतवारी यंत्र घरच्याघरी तयार करता येते. 

लिंबू या फळाचा सरासरी व्यास ५.५ सेमी ते ३.५ सेमी असा असतो. या व्यासानुसार लोखंडी सळ्यांच्या सहाय्याने एक २५ से.मी. व्यासाची आणि ६ फूट लांबी असलेला ज्याच्या एका बाजूला फिरवण्यासाठी मूठ असावी असा दंडगोलाकार बनवून घ्यावा.

त्याला लिंबाच्या आकारानुसार दोन सळ्यांमध्ये अंतर ठेवावे जसे पहिला कप्पा ३.५ से.मी. दुसरा कप्पा ४.५ से.मी. आणि तिसरा कप्पा ५.५ से. मी. जेव्हा आपण हँडल फिरवू तेव्हा हॉपर मधील लिंबू फिरणाऱ्या दंडगोलाकारामध्ये पडतील.

फिरणाऱ्या दंडगोलाकारामुळे लिंबांना गती प्राप्त होईल व लिंबू पुढच्या दिशेने ढकलली जातील. पुढे आकारानुसार दंडगोलाकारा मधून खाली पन्हाळा मधून कॅरेटमध्ये जमा होतील. अशाप्रकारे अतिशय कमी खर्चात शेतकरी हे यंत्र बनवून घेऊ शकतात. ज्यामुळे शेतकऱ्यांचा मजुरीवरिल खर्च आणि वेळ दोन्हीची बचत होईल.

कानिफनाथ नाकाडे

(आदित्य कृषी अभियांत्रिकी महाविद्यालय, बीड)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: कापसाचा वाढलेला भाव टिकून; हरभरा आवक वाढली, तूर दबावातच, सरकीचे दर टिकून तर पपईला मागणी

Weather Update in Maharashtra : मराठवाड्यात गारपीटीचा इशारा; कोकण, मध्यम महाराष्ट्रासह विदर्भात पावसाचा अंदाज

Agriculture AI: ‘एआय’ तंत्रज्ञानातून कमी खर्चात सुरू उसाचे एकरी १०४ टन उत्पादन

Shaktipeeth Highway: शक्तिपीठ महामार्ग बदलण्याचे श्रेय शेतकरी संघर्ष समितीला

Honoring Women Farmers: सन्मान महिलाशक्तीचा...

SCROLL FOR NEXT