दुचाकीला ट्रॉली जोडल्यामुळे अधिक शेतीमालाची वाहतूक करणे सचिन आळणे यांना शक्य झाले आहे.
दुचाकीला ट्रॉली जोडल्यामुळे अधिक शेतीमालाची वाहतूक करणे सचिन आळणे यांना शक्य झाले आहे. 
टेक्नोवन

दुचाकीला ट्रॉलीचे जुगाड अन् सुरू झाला रोजगार...

Santosh Munde

बीड : शेतात सालदार म्हणून काम करणाऱ्या सचिन रोहिदास आळणे या युवकाने कल्पना लढवत दुचाकीला छोट्या ट्रॉलीची जोड दिली आहे. छोट्या-मोठ्या शेतीउपयोगी कामाला ही ट्रॉली उपयोगी पडत असून, ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर टाळेबंदीमध्ये भाजीपाला वाहतुकीसाठीही फायदेशीर ठरली. त्यातून युवकाला रोजगाराचे नवे साधन सापडले आहे.  

मूळ हिंगोली जिल्ह्यातील आडुळ (ता. सेनगाव) येथील सचिन आळणे यांनी दुचाकीवरील ट्रॉली या कल्पनेचा प्रवास उलगडला. ते म्हणाले, की रोजगारासाठी गेवराई तालुक्यातील तलवाडा येथे आलो. येथील भगवान नगर परिसरातील भाऊसाहेब लटपटे यांच्या शेतावर सालदार म्हणून रुजू झालो. तिथून औरंगाबाद परिसरातील एका खडी क्रशरवर काम करण्यासाठी गेलो असताना मालकाच्या मदतीने दुचाकी घेतली. तिथे वेल्डिंग मशीनची कामे करताना दुचाकीचे शॉकॲबसॉर्बर पाहिले. अशाच शॉकॲबसॉर्बरचा वापर करून ट्रॉली तयार केल्यास दुचाकीला जोडता येईल, असा विचार मनात आला. वेल्डिंग करून दोन अँगलमध्ये बेअरिंग टाकून त्यामध्ये टायर बसवले. त्याला ट्रॉलीचा ढाचा जोडला. मात्र, खर्च करणे शक्य नसल्याने घरातील लोखंडी कॉट ट्रॉलीच्या खालील अँगलवर उलटी टाकून वेल्ड केली. ही ट्रॉली दुचाकीला मागील चाकाला दोन ॲंगलच्या साहाय्याने जोडली. छोट्या मोठ्या कामासाठी ही ट्रॉली उपयुक्त पडत असे. 

दरम्यान पुन्हा औरंगाबाद वरून भाऊसाहेब लटपटे यांच्याकडे सालदार म्हणून रुजू झालो. ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या टाळेबंदीमध्ये शेतकऱ्यांना आपला शेतीमाल बाजारात नेण्यात अडचणी येऊ लागल्या. विविध कारणांमुळे किंवा अडवून धरून अधिक भाडे मिळवण्यासाठी मालवाहू वाहने तयार होत नसल्याचा अनेकांचा अनुभव आहे.

शेजारचेच शेतकरी एकनाथ गर्जे यांनी भेंडीचे उत्पादन घेतले आहे. ही भेंडी तालुक्याला नेण्यासाठी मालवाहू वाहने सुमारे सहाशे रुपये प्रति ट्रिप घेतात. भाडेपट्टी देऊनही अनेकदा वाहन मिळत नाहीत. अशा स्थितीत सचिन दुचाकीला जोडलेल्या ट्रॉलीवर शेतातील वैरण व १ ते २ क्विंटल मालाची वाहतूक सहजतेने करतात. भेंडी उत्पादक गर्जे यांची अडचण लक्षात घेऊन सचिन यांनी त्यांना वाजवी दरात तालुक्याला भेंडी पोचवण्याची हमी दिली. त्यातून हे काम मिळाले. भेंडी पोहोचवण्याच्या या कामासाठी सुमारे शंभर रुपये इंधन खर्च होतो. त्यातून किमान तीनशे ते चारशे रुपये रोज मिळू लागल्याचे आळणे यांनी सांगितले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Drip Irrigation : ठिबक सिंचनासाठी ‘जीएसआय’ प्रणालीचा वापर

Agriculture Success Story : हवामान बदलाला सुसंगत शेती वरकड बंधूंची...

Rice Research : ‘बी१’ जीवनसत्त्व अधिक असलेला भात विकसित

Waghad Project : ‘वाघाड’ने घडविला कायापालट

Water Crisis : सोलापूर जिल्ह्यात १०२ गावांना टँकरने पाणी सुरू

SCROLL FOR NEXT