Culticycle Agrowon
टेक्नोवन

Culticycle : विविध शेतीकामासाठी कल्टिसायकल

सहजपणे उपलब्ध होतील अशा सायकल व लॉन ट्रॅक्टरच्या भागापासून कल्टिसायकल विकसित करण्यात आली आहे.

Team Agrowon

पीक व्यवस्थापनात कामे सुलभपणे होण्यासाठी वेगवेगळ्या यंत्रांचा वापर होत असतो. शेतातील प्रत्येक कामासाठी यंत्र विकत घेणं प्रत्येक शेतकऱ्यांला शक्य नसतं. काही शेतकरी तुटलेली यंत्रे किंवा टाकाऊ वस्तूपासून काहीतरी जुगाड करुन यंत्र विकसित करण्याचा प्रयत्न करित असतात. अशाच पद्धतीने उत्तर कॅलिफोर्नियातील सेंद्रिय पद्धतीने भाजीपाला उत्पादित करणाऱ्या ग्रीन ट्रॅक्टर फार्म (Green Tractor Farm) या संस्थेच्या टीम कुक यांनी कल्टिसायकल हे बहुपयोगी यंत्र विकसित केले आहे. कल्टिसायकलचा (Culticycle) उपयोग बियांची पेरणी करण्यासाठी, तणे काढण्यासाठी व काही निवडक पिकाच्या रोपांच्या पुनर्लागवडीसाठी होतो. नंतर या सायकलमध्ये गरजेनुसार महत्त्वाचे बदल करण्यात आले, ज्यामुळे शेतीतील कामे कमी खर्चात अधिक सुलभतेने करता येतात. सहजपणे उपलब्ध होतील अशा सायकल व लॉन ट्रॅक्टरच्या भागापासून कल्टिसायकल विकसित करण्यात आली आहे.

वैशिष्ट्ये काय आहेत?  

- सायकलचा वेग पेडल मारण्यावर व निवडलेल्या गीअरवर अवलंबून असतो. तरी सरासरी प्रतितासाला ३ ते ४ मैल वेगाने काम करता येते.

- आंतरमशागत करताना पीकामधील जमीन अधिक कडक होत नाही.

- इंधनाची आवश्यकता नसते. त्यामुळे इंधनावर होणारा खर्च वाचतो.

- कमी क्षेत्रासाठी ही सायकल उपयोगी ठरते.

- पिकाची पेरणी करण्यासाठी, तणे काढण्यासाठी व काही निवडक पिकाच्या रोपांच्या लागवडीसाठी या सायकलचा उपयोग होतो.

रचना कशी आहे?

- कल्टिसायकलचा पुढचा भाग दोन सायकलचा पुढचा भाग जोडून तयार करण्यात आला आहे.

- मागचा भाग लॉन ट्रॅक्टरच्या मागचा एटीव्ही टायर असलेला भाग जोडून तयार करण्यात आला आहे.

- सायकलचा पुढचा व मागचा भाग लोखंडी फ्रेमने थोडा वरच्या बाजूला मोटारसायकलच्या दातेरी चाकावर बसवलेल्या चेनसह जोडला आहे. त्यामुळे पेडल मारता येते.

- लोखंडी फ्रेमच्या खालच्या भागात आवश्यक यंत्रे जोडण्यासाठी जागा तयार केली आहे. या ठिकाणी यंत्र जोडून काम करता येते.

- हँडल म्हणून सायकलचेच हॅंडल बसविण्यात आले आहे त्यामुळे पुढील चाकांवर चालवताना नियंत्रण मिळवता येते.

- वरच्या बाजूला बसण्यासाठी मध्यभागी सीट जोडले आहे ज्यामुळे या सीटवर बसून आवश्यक काम करता येते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

PM Kisan Installment Date : पीएम किसानच्या हप्त्याची प्रतिक्षा कायम; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा

Agrowon Podcast: उडदाचे भाव दबावातच; बाजरीचे दर स्थिर, कोबी- मेथीचा भाव टिकून, फ्लाॅवर दर तेजीत

Maharashtra Rain: राज्यात पावसाचा जोर वाढणार; विदर्भ आणि कोकणात पावसाचा जोर अधिक राहणार

APMC SIT Investigation: नागपूर बाजार समितीच्या चौकशीसाठी एसआयटी

Cotton Farming : पूर्वहंगामी कापूस पिकाची वाढ जोमात

SCROLL FOR NEXT