Agriculture Drone Agrowon
टेक्नोवन

Drone : हेक्साकॉप्टर ड्रोनद्वारे पीक फवारणी प्रात्यक्षिक

पीक उत्पादन खर्चासह वेळ व श्रमामध्ये बचत करण्यासाठी शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढविणे आवश्यक आहे.

टीम ॲग्रोवन

नाशिक ः येथील मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या कृषी तंत्र विद्यालयाच्या प्रक्षेत्रावर ‘एकच ध्यास विषमुक्त शेतीचा करूया सर्वांगीण विकास’ या संकल्पनेंतर्गत आधुनिक हेक्साकॉप्टर (Modern Hexacopter Drone) या ड्रोनच्या साह्याने प्रक्षेत्रावरील पिकांवर दशपर्णी अर्क फवारणी प्रात्यक्षिक (Drone Spraying Demonstration) आयोजित करण्यात आले. याच अनुषंगाने विषमुक्त शेतीसोबतच सुधारित तंत्रज्ञानावर (Agriculture Technology) भर देण्यासाठी संस्थेच्या सरचिटणीस निलीमा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कामकाज सुरु आहे.

पीक उत्पादन खर्चासह वेळ व श्रमामध्ये बचत करण्यासाठी शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढविणे आवश्यक आहे. ड्रोनसारख्या आधुनिक तंत्राचा वापर पिकांमध्ये फवारणीसाठी केल्यास वेळ आणि श्रमामध्ये मोठी बचत शक्य आहे. याच अनुषंगाने संस्थेचे पदाधिकारी व शिक्षणाधिकारी डॉ.नानासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रात्यक्षिक घेण्यात आले.

यावेळी ई-डिजिटल बॉक्सचे अभियंता अमर ठाकरे व डॉ.पाटील यांनी ड्रोनच्या विविध भागांची जुळणी, इंधन, बॅटरी, रिमोट हाताळणी तसेच ड्रोनची कार्यपद्धती आणि त्याच्या प्रत्यक्ष वापराच्या उपयुक्ततेची माहिती विद्यार्थ्यांना दिली.

कृषी व अभियांत्रिकी शाखेच्या विद्यार्थ्यांनी संशोधनात सहभाग घेतल्यास प्रत्यक्ष शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल. भविष्यात शेतीमधील आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांसाठी निश्चितच वरदान ठरेल, यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन सरचिटणीस श्रीमती पवार व संचालक नानासाहेब महाले यांनी केले.

या प्रात्यक्षिकाच्या निमित्ताने विद्यार्थी आणि शिक्षकांना ड्रोनद्वारे फवारणी कशी होते याचा प्रत्यक्षपणे अनुभव घेता आला, अशी माहिती संस्थेद्वारे देण्यात आली. या प्रात्यक्षिक आयोजन व तांत्रिक मार्गदर्शनाबद्दल कृषी तंत्र विद्यालयाचे प्राचार्य कमलेश भोये यांनी ठाकरे यांचे आभार मानले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fertilizer Shortage: युरिया, डीएपी, पोटॅश, एनपीके ग्रेडच्या खतांचा कमी पुरवठा

Monsoon Preparedness Concerns: मॉन्सूनपूर्व तयारीवर प्रश्नचिन्ह

Solid Waste Management: घनकचरा व्यवस्थापनासाठी पिंपळगाव बसवंतला सव्वासात कोटी

Rural Water Crisis: महाड तालुक्यात गावे तहानलेली

Shaktipeeth Highway Protest: खाकी वर्दीची दडपशाही खपवून घेणार नाही, शक्तिपीठ महामार्गाविरोधात शेतकरी संतप्त, विटा 'तहसील'वर आक्रोश मोर्चा

SCROLL FOR NEXT