१६ ते १८ मे या काळामध्ये उपग्रहाद्वारे मिळालेल्या या नकाशामध्ये सरासरीपेक्षा अधिक ओलावा असलेले भाग हिरव्या रंगात, तर सरासरीपेक्षा अधिक कोरडे असलेले भाग तपकिरी दिसत आहेत. (स्रोत ः जोशुआ स्टिव्हन्स.)
१६ ते १८ मे या काळामध्ये उपग्रहाद्वारे मिळालेल्या या नकाशामध्ये सरासरीपेक्षा अधिक ओलावा असलेले भाग हिरव्या रंगात, तर सरासरीपेक्षा अधिक कोरडे असलेले भाग तपकिरी दिसत आहेत. (स्रोत ः जोशुआ स्टिव्हन्स.) 
टेक्नोवन

मातीतील आर्द्रतेच्या माहितीसाठ्यावरून मिळू शकेल जागतिक पीक अंदाज

वृत्तसेवा

अमेरिकन अंतरीक्ष संशोधन संस्था (नासा) यांच्यातर्फे खास मातीतील ओलाव्याचे प्रमाण मोजण्यासाठी उपग्रह पाठवण्यात आला होता. त्याच्याकडून उपलब्ध झालेल्या माहितीच्या आधारे अमेरिकन कृषी विभागाने जागतिक कृषी क्षेत्र आणि विविध पिकांच्या उत्पादनावर लक्ष ठेवण्यात येत आहे. या माहितीतून पिकांच्या उत्पादनाचे अंदाज आधीच मिळवणे शक्य होणार आहे. अमेरिकेतील नासा या संस्थेने २०१५ मध्ये मातीतील आर्द्रता मोजण्याच्या उद्देशाने खास एक उपग्रह (The Soil Moisture Active Passive mission, किंवा SMAP) पाठवला होता. त्याकडून गोडार्ड स्पेस फ्लाईट सेंटरमध्ये उपलब्ध होत असलेल्या माहितीची सांगड अमेरिकी कृषी विभागाच्या परकीय कृषी सेवेच्या माहितीशी घालण्यात येत आहे. त्याद्वारे जगभरातील कृषी क्षेत्रामध्ये दुष्काळ किंवा पूरप्रवण स्थितीवर लक्ष ठेवणे शक्य होणार आहे. त्याचप्रमाणे विविध विभागांतील मातीचा ओलावा, तापमान, पावसाचे प्रमाण, हिरवळीचे प्रमाण आणि एकूण पिकांची स्थिती समजण्यास मदत होणार आहे.

  • जागतिक पीक उत्पादनाच्या स्थितीमुळे अर्थव्यवस्था, सामाजिक आणि मानवता अशा अनेक घटकांवर मोठा परिणाम होतो. पिकाच्या उत्पादनावर परिणाम करणारा महत्त्वाचा घटक म्हणजे पाण्याची उपलब्धता. त्यावर या उपक्रमामध्ये लक्ष ठेवण्यात येत असल्याचे गोडार्ड येथील संशोधिका इलियाना एमलॅडेनोव्हा यांनी सांगितले.
  • पाऊस आणि तापमान यांच्या सातत्यपूर्ण निरीक्षणावरून संगणकीय प्रारूपाद्वारे मातीतील आर्द्रता मोजण्यात येते. ज्या भागामध्ये हवामान मोजण्याची यंत्रे उपलब्ध नाहीत, अशा ठिकाणी काही प्रमाणात त्रुटी राहत असल्या तरी अंदाज मिळण्यासाठी या यंत्रणेचा चांगला उपयोग होतो. या मातीच्या आर्द्रतेच्या माहितीच्या विश्लेषणासाठी ऑनलाइनही काही साधने (उदा. गुगल अर्थ इंजिन) उपलब्ध आहेत. त्यामुळे या माहितीचा उपयोग जगभरातील शास्त्रज्ञही करू शकतील.
  • अधिक माहितीसाठी वेबसाइट ः http://smap.jpl.nasa.gov https://ipad.fas.usda.gov/cropexplorer/ https://explorer.earthengine.google.com/#detail/NASA_USDA%२FHSL%२FSMAP_soil_moisture  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

    Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

    Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

    Agrowon Podcast : मक्याला काय भाव मिळतोय? कापूस, सोयाबीन, गहू, टोमॅटो यांचे दर काय आहेत?

    Sugar Quota : मे महिन्यात साखरेचा कोटा वाढला, घाऊक बाजारात मंदीची लाट

    SCROLL FOR NEXT