मच्छीमारांसाठी अद्ययावत ‘जीआयएस` प्रणाली
मच्छीमारांसाठी अद्ययावत ‘जीआयएस` प्रणाली 
टेक्नोवन

मच्छीमारांसाठी अद्ययावत ‘जीआयएस` प्रणाली

वृत्तसेवा

कोची (केरळ) ः येथील केंद्रीय सामुद्री मत्स्य संशोधन संस्थेतील तज्ज्ञांनी देशभरातील मच्छीमारांच्या सुरक्षिततेसाठी भौगोलिक माहिती प्रणाली (जीआयएस) विकसित केली आहे. संस्थेचे संचालक डॉ. ए. गोपालकृष्णन म्हणाले, की या प्रणालीमध्ये गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, ओडिशा, पश्चिम बंगाल या सर्व राज्यांतील १,२७८ केंद्रांची नोंद ठेवलेली आहे. त्यामुळे किनारपट्टी असलेल्या सर्व राज्यातील मासेमारी केंद्रांची माहिती एकाच ठिकाणी सर्वांना उपलब्ध झालेली आहे. या प्रणालीमुळे विविध किनारपट्टीच्या भागात कोणत्या माशांची उपलब्धता आहे, माशांच्या जातींमधील विविधता, माशांची प्रजनन ठिकाणे, माशांची उपलब्धता याची माहिती नोंदविली जाते. या नोंदीवरून येत्या काळात माशांच्या कोणत्या जाती कमी होत आहेत, याची माहिती जमा होऊन त्यांच्या संवर्धनासाठी विशेष उपक्रम हाती घेणे शक्य होणार आहे. प्रत्येक समुद्र किनाऱ्यानुसार माशांच्या जातींच्या उपलब्धतेचे नकाशे तयार केले जात आहेत. प्रणालीच्या माध्यमातून समुद्रामध्ये मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांना देशभरातील सुरक्षित किनाऱ्यांची माहिती मिळणार आहे. या प्रणालीमुळे संबंधित समुद्र किनाऱ्याजवळ मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांना परिसरातील मत्स्य उत्पादनाची स्थिती, जवळपासचे किनारे यांची तत्काळ माहिती मिळणे सोपे जाणार आहे. आपत्कालीन परिस्थितीत ही प्रणाली मच्छीमारांसाठी मार्गदर्शक ठरणारी आहे. या प्रमाणीमुळे समुद्रातील कोणत्या भागात मच्छीमार आहेत, जवळचे संपर्क केंद्र कोणते आहे, याची तात्काळ माहिती नौसेना तसेच मच्छीमारांना मिळेल. समुद्र किनारपट्टीवरील संशयास्पद हालचालींची तातडीने माहिती नौसेनेला मिळणार आहे. मच्छीमारांच्या बरोबरीने देशाच्या सुरक्षिततेसाठी ही प्रणाली उपयुक्त ठरणारी आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Market : कांदा उत्पादकांच्या डोळ्यात पुन्हा धुळफेक; सरकारने दिलेली ९९,१५० टन निर्यातीला परवानगी जुनीच

Fertilizer Demand : चोपडा तालुक्याला २७ हजार टन खतांची गरज

Agrowon Podcast : कापूस भाव स्थिरावले ; कापूस, सोयाबीन, तूर, तसेच आल्याचा काय आहे दर ?

Animal Treatment : दररोज ३०-४० जनावरांवर उपचार बंधनकारक

Kharif Season : खरिपात वाढणार सोयाबीन, कपाशी क्षेत्र

SCROLL FOR NEXT