varical farming
varical farming 
टेक्नोवन

दोन एकर ‘व्हर्टिकल फार्म’ मध्ये ७२० एकरांचे उत्पादन !

सतीश कुलकर्णी

सॅनफ्रान्सिस्को येथील प्लेन्टी या कंपनीने मजल्याच्या शेतीला यंत्रमानव आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांची जोड देत उत्तम दर्जाच्या भाजीपाला आणि औषधी वनस्पतींच्या शेतीमध्ये क्रांती केली आहे. या संपूर्णपणे संरक्षित, अंतर्गत शेतीमध्ये पारंपरिक शेतीच्या तुलनेमध्ये ९५ टक्के पाणी आणि ९९ टक्के क्षेत्र कमी वापरले जाणार आहे.  गेल्या काही वर्षांमध्ये शेतकरी शेती अधिक सुलभ, अचूक करण्यासाठी ड्रोन्स, यंत्रमानव यांसारख्या आधुनिक साधनांचा वापर करत आहेत. केवळ कृषी क्षेत्रामध्ये लागवडीपासून काढणीपर्यंत विविध टप्प्यांवर कार्यरत असलेल्या स्टार्टअप उद्योगांची संख्या १६०० पेक्षा अधिक असून, एकूण गुंतवणूक ही दहा अब्ज डॉलरपेक्षा अधिक आहे. अशा स्टार्टअपपैकी एक असलेल्या प्लेन्टी या कंपनीचे सहसंस्थापक आणि मुख्य संशोधन अधिकारी नॅटे स्टोरे यांनी शेती आणि पद्धतीमध्ये संपूर्णपणे नावीन्यता आणली आहे. नॅटे स्टोरे यांनी सांगितले, की व्हर्टिकल फार्मिंग आणि बंदिस्त शेती हेच शेतीचे भविष्य असणार आहे. या आधुनिक पद्धतीमुळे जगाच्या पाठीवर कुठेही, वर्षभर शेती करता येईल. या शेतामध्ये यंत्रमानव कौशल्याची कामे करतील, तर कृत्रिम बुद्धिमत्तेने विविध आवश्यक निर्णय घेतले जातील. परिणामी फळे, भाजीपाला आणि औषधी वनस्पती उत्पादनांचा दर्जा उच्चतम पातळीवर राहील. केवळ दोन एकर व्हर्टिकल फार्ममध्ये ७२० एकर सपाट शेतीइतके उत्पादन घेता येईल. व्हर्टिकल फार्मची वैशिष्ट्ये 

  • सपाट शेतीच्या तुलनेत वर्षभर आणि प्रति एकर चारशे पट अधिक उत्पादन
  •  संपूर्णपणे अंतर्गत, बंदिस्त  वातावरण नियंत्रित शेती
  • छतापासून जमिनीपर्यंत बांधलेल्या भिंतीवर रोपांची वाढ. 
  • प्रकाश संश्‍लेषणासाठी कृत्रिम प्रकाशाची (एलईडी) उपलब्धता.
  • दोन ओळींमध्ये असलेल्या चिंचोळ्या जागेतील सर्व कामे करणारे यंत्रमानव.
  •  आवश्यक वातावरण, तापमान, प्रकाश आणि पाणी यांचे नियंत्रण कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे.  
  • पर्यावरणासाठी फायदे

  • ९५ टक्के पाण्याचा पुनर्वापर, बाष्पीभवनाद्वारे बाहेर पडणारे पाणी गोळा करण्याची यंत्रणा.
  •  शहरामध्ये ताज्या भाज्या, फळे यांचे उत्पादन घेणार असल्याने वाहतूक, गोदाम यावरील खर्चात बचत आणि त्यामुळे होणाऱ्या कार्बन डायऑक्साइड प्रदूषणात घट होईल. 
  •  या शेतीमध्ये जनुकीय सुधारित नसलेली (नॉन जीएम) पिके घेण्यात येत असून, तणनाशक व कीटकनाशकांचा वापर केला जात नाही. 
  •  या फार्मसाठी आवश्यक १०० टक्के ऊर्जा अपारंपरिक स्रोतांतून मिळवली जाते. 
  •   यामध्ये वापरल्या जाणाऱ्या वस्तू व पॅकेजिंग १०० टक्के पुनर्वापरयोग्य प्लॅस्टिकच्या आहेत.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Agrowon Podcast : सोयाबीनमध्ये काहीशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, हरभरा, कांदा यांचे काय आहेत दर ?

    APMC Market : ढोलबारेत खासगी बाजार समिती सुरू

    Gokul Milk Sangh : उन्हाळ्यात गोकुळची दूध क्रांती, तब्बल २ लाख लिटरने संकलन वाढलं

    Onion Auction : मुंगसे उपबाजार आवारात अखेर कांद्याचे लिलाव सुरू

    Agriculture Update : शेतकऱ्यांना बियाणे, खते योग्यवेळी उपलब्ध करून द्या

    SCROLL FOR NEXT