PM Kisan Scheme
PM Kisan Scheme  Agrowon
कृषी योजना व शासन निर्णय

Pradhan Mantri Kisan Samman Yojana : गोंदियात अडीच लाख शेतकऱ्यांना वर्षाला मिळणार १२ हजार रुपये

Team Agrowon

Gondiya News : पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या (Pradhan Mantri Kisan Samman Yojana) धर्तीवर राज्यातील शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी महासन्मान योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अर्थसंकल्पात त्याविषयी घोषणा करण्यात आली. गोंदिया जिल्ह्यात अडीच लाखांवर शेतकऱ्यांना याद्वारे वर्षाकाठी १२ हजार रुपये मिळणार आहेत.

केंद्र सरकारने पीएम किसान सन्मान योजनेअंतर्गत वर्षाकाठी सहा हजार रुपये देण्याचा निर्णय यापूर्वीच घेतला आहे. योजनेचा १३ वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात नुकताच जमा करण्यात आला. ही रक्‍कम अत्यल्प असली तरी अनेक ज्येष्ठ शेतकऱ्यांना यातून गरजेच्यावेळी पैशाची उपलब्धता होत असल्याचे चित्र आहे.

परिणामी याचे फायदे लक्षात घेता राज्य सरकारनेदेखील पीएम किसान सन्मान योजनेच्या धर्तीवर नमो शेतकरी महासन्मान योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेतदेखील वर्षाला तीन टप्प्यांत प्रत्येकी दोन हजार याप्रमाणे सहा हजार रुपये देण्यात येणार आहेत.

गोंदिया जिल्ह्यात पीएम किसान सन्मान योजनेचे २ लाख ७२ हजार लाभार्थी होते. मात्र नुकत्याच करण्यात आलेल्या सर्वेक्षणाअंती ही संख्या २ लख ३० हजार १६५ वर आली आहे. अपात्र लाभार्थ्यांना यातून वगळण्यात आले.

यात येत्या काळात चार ते पाच हजार शेतकऱ्यांची भर पडण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. मात्र सद्यःस्थिती लक्षात घेता २ लाख ३० हजार १६५ शेतकऱ्यांना वर्षाकाठी १२ हजार रुपये मिळणार हे निश्‍चित झाले आहे.

तालुकानिहाय लाभार्थी शेतकरी संख्या

आमगाव - २२५२३

अर्जुनी मोरगाव - २७०८९

देवरी - २१६१२

गोंदिया - ५३७७८

गोरेगाव - २४१७२

सडक अर्जुनी - २५८८१

सालेकसा - ३६३७३

तिरोडा - १८५५१

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : सोयाबीनमध्ये काहीशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, हरभरा, कांदा यांचे काय आहेत दर ?

APMC Market : ढोलबारेत खासगी बाजार समिती सुरू

Gokul Milk Sangh : उन्हाळ्यात गोकुळची दूध क्रांती, तब्बल २ लाख लिटरने संकलन वाढलं

Onion Auction : मुंगसे उपबाजार आवारात अखेर कांद्याचे लिलाव सुरू

Agriculture Update : शेतकऱ्यांना बियाणे, खते योग्यवेळी उपलब्ध करून द्या

SCROLL FOR NEXT