Namo Scheme Agrowon
कृषी योजना व शासन निर्णय

NAMO Shetkari Yojana : ‘नमो’चा पहिला हप्ता ३२ लाख शेतकऱ्यांना नाही

Agriculture Scheme : पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेचे निकष नमो शेतकरी महासन्मान योजनेला लागू करण्यात आले आहेत.

Team Agrowon

Mumbai News : पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेचे निकष नमो शेतकरी महासन्मान योजनेला लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे ७१ लाख शेतकऱ्यांपैकी निकषांची पूर्तता होत नसल्याने ३२ लाख ३७ हजार शेतकरी पहिल्या हप्त्यापासून वंचित राहणार आहेत,’’ अशी माहिती राज्य सरकारने एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात विधानपरिषदेत दिली.

‘पंतप्रधान शेतकरी सन्मान’ आणि ‘नमो’ योजने अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना लाभ देण्याबाबत अमोल मिटकरी यांच्यासह अन्य सदस्यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला. या प्रश्नाच्या लेखी उत्तरात ‘सन्मान’ योजनेतील अपात्र शेतकऱ्यांची वसुली आणि ‘नमो’तील अपात्र शेतकऱ्यांची माहिती देण्यात आली.

राज्यातील ११ लाख अपात्र शेतकऱ्यांच्या खात्यांत १ हजार ५५४ कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. त्या अनुषंगाने केंद्र सरकारने दिलेल्या आदेशानुसार आजपर्यंतच्या पडताळणीत गोंदिया जिल्ह्यातील पाच हजार ६४५ शेतकऱ्यांना अपात्र ठरविले. दीड हजार लाभार्थ्यांची जमीनच नाही.

त्यामुळे ही रक्कम वसूल करून अन्य शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यावर थकबाकी नोंद केली आहे. राज्यातील ७१ लाख लाभार्थी शेतकऱ्यांपैकी निकषांची पुर्तता न करणाऱ्या ३२ लाख ३७ हजार शेतकरी राज्य सरकारच्या पहिल्या हप्त्यापासून वंचित राहणार आहेत, हे खरे आहे का असा प्रश्न विचारण्यात आला. यावर राज्य सरकारने हे अंशतः: खरे असल्याचे लेखी उत्तरात म्हटले आहे.

‘शेतकरी सन्मान’च्या मार्गदर्शक सूचनांमधील अपात्रतेच्या निकषानुसार राज्यात १४ लाख २८ हजार अपात्र लाभार्थ्यांकडून १ हजार ७५४. ५० कोटी रुपयांची रक्कम वसूलपात्र आहे. यापैकी १ लाख ४ लाभार्थ्यांकडून ९३.२१ कोटी रुपयांची रक्कम वसूल केली आहे.

केंद्राने केलेल्या तपासणीमध्ये गोंदिया जिल्ह्यातील २७ हजार ५९९ लाभार्थ्यांपैकी १५ हजार २५९ लाभार्थ्यच्या तपासणीअंती एकूण १४४८ लाभार्थी अपात्र ठरले आहेत. उर्वरित लाभार्थ्यांची तपासणी करणे अजून बाकी आहे.

नोंदी अद्ययावतीकरणाचे काम सुरु

राज्यातील ९७. ६५ लाख पात्र लाभार्थ्यांपैकी ९५. २७ लाख लाभार्थ्यांच्या भूमि अभिलेख नोंदी ‘शेतकरी सन्मान’च्या पोर्टलवर अद्ययावत करण्यात आलेल्या आहेत. उर्वरित २. ३९ लाख लाभार्थ्यांच्या नोंदी अद्ययावत करण्यासाठी संबंधित सर्व जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत, असेही राज्य सरकारने उत्तरात म्हटले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Payment: उसाचा १०० रुपये दुसरा हप्ता तातडीने जमा करा अन्यथा आंदोलन, 'स्वाभिमानी'चा कारखान्यांना इशारा

Parbhani Dam Water Update: परभणी जिल्ह्यातील लघु प्रकल्पांत ११, मध्यम प्रकल्पांत ९ टक्के पाणीसाठा

Turmeric Farmers Support: हळदीला विमा संरक्षणाने शेतकऱ्यांना दिलासा

Fertilizer Dealers Complaint: खत विक्रीत लिंकिंगचा आरोप

Women Farmers: ‘वसंधुरा’च्या महिलांकडून सायकल कोळप्याने कोळपणी

SCROLL FOR NEXT