Sugarcane Harvesting Agrowon
कृषी योजना व शासन निर्णय

Sugarcane Harvester : ऊसतोडणी यंत्र लवकरच अनुदान कक्षेत

राज्य शासनाने साखर आयुक्तालयाकडून या बाबत माहिती मागवली होती. तोडणीयंत्राला अनुदान मिळण्यासाठी उपयुक्त सूचना व शिफारशी शासनाकडे सादर करण्यात आलेल्या आहेत.

Team Agrowon

Sugarcane Season पुणे ः ऊसतोडणीच्या (Sugarcane Harvesting) कामात उद्‍भवलेली मनुष्यबळाची समस्या सोडविण्यासाठी ऊस तोडणी यंत्राला (Sugarcane Harvester) (केन हार्वेस्टर) कमाल ३५ लाख रुपयांपर्यंत अनुदान (Subsidy) द्यावे, अशी शिफारस करण्यात आली आहे. राज्य शासन याबाबत लवकरच अंतिम निर्णय घेण्याची शक्यता आहे.

राज्य शासनाने साखर आयुक्तालयाकडून या बाबत माहिती मागवली होती. तोडणीयंत्राला अनुदान मिळण्यासाठी उपयुक्त सूचना व शिफारशी शासनाकडे सादर करण्यात आलेल्या आहेत. साखर कारखाने देखील या शिफारशींकडे उत्सुकतेने बघत आहेत.

‘‘राज्यात उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले असून, तोडणी कामातील मनुष्यबळ झपाट्याने घटले आहे. त्यामुळे तोडणी यंत्रांची संख्या वाढविल्याशिवाय पर्याय नाही.

मात्र एका यंत्रासाठी किमान एक कोटी रुपयांच्या आसपास गुंतवणूक करावी लागते. परिणामी, यंत्रांची संख्या अपेक्षेप्रमाणे वाढलेली नाही,’’ अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली.

राज्यात सध्या एक हजारापेक्षा जास्त तोडणी यंत्रे कार्यान्वयित आहेत. परंतु,यातील बहुतेक यंत्रांना अनुदान देण्यात आलेले नाही.

यापूर्वी अनुदान योजना सुरू असताना २९७ यंत्रांना ७७ कोटी रुपये अनुदानापोटी वाटले गेले होते. परंतु अनुदानाची योजना पुढे बंद करण्यात आली. त्यामुळे २०१८ पासून एकाही यंत्राला अनुदान दिलेले नाही.

‘‘अनुदान योजना पुन्हा सुरू करून ऊसतोडणी यंत्र किमतीच्या ४० टक्क्यांपर्यंत किंवा कमाल ३५ लाखांपर्यंत अनुदान दिले जावे. तशी शिफारसदेखील राज्य शासनाला करण्यात आली आहे,’’ असे साखर उद्योगातील सूत्रांनी स्पष्ट केले.

साखर उद्योगात सातत्याने होत असलेल्या सकारात्मक बदलामुळे तसेच उसाला रास्त व किफायतशीर दर चांगले मिळत असल्यामुळे राज्यात ऊस लागवड वाढली आहे.

चालू हंगामात ऊस लागवड १४ लाख ८९ हजार हेक्टरच्या पुढे गेली. त्यामुळे यंदा किमान १४४५ लाख टनाच्या आसपास ऊस तोडला जात आहे.

कमी मजुरी, जीवनावश्यक सुविधांचा अभाव, पाण्याची समस्या तसेच मजुरीसाठी इतर पर्याय अशा विविध कारणांमुळे आता ऊस तोडणीची कामे करण्याकडे मजुरांचा ओढा कमी झालेला आहे. त्यामुळेच राज्यात ऊस तोडणी यंत्रांची संख्या वाढते आहे.

प्रतिदिन १२५ टनापर्यंत तोडीची क्षमता

राज्यात ऊस तोडणी मजुरांची संख्या ८ ते १० लाखांच्या आसपास आहे. मजुरांकरवी होणारी तोडणी कष्टाची असल्याने कमी क्षेत्रापुरती होते, तुलनेत तोडणी यंत्रामुळे एका दिवसात १२५ टनांपर्यंत ऊसतोडणी शक्य झाली आहे.

लातूरच्या मांजरा साखर कारखान्यांसह काही साखर कारखाने आता ५०-६० यंत्रे लावून ऊस तोडी करत असल्यामुळे कारखाने मोठ्या प्रमाणात तोडणी यंत्रांना पसंती देत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

New Gram Panchayat Schemes: ग्रामपंचायतींसाठी पाच नव्या योजनांना मंजुरी

Cibil Score Issue: कर्जमुक्ती योजनेमुळे सिबिल स्कोअरवर परिणाम : तुपकर

Farmer Protest Warning: ‘डीबीटी’साठी शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

Mechanical Paddy Transplanting: चिखलगावात यांत्रिक पद्धतीने भात लागवड

Onion Tomato Report: कांदा, टोमॅटोचा अहवाल १५ ऑगस्टपर्यंत सादर करा: पाशा पटेल समितीला निर्देश

SCROLL FOR NEXT