Pm Kisan  Agrowon
कृषी योजना व शासन निर्णय

Pm kisan : ‘पीएम किसान’च्या हप्त्याची अद्याप प्रतीक्षा

Pm kisan Update : दर चार महिन्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यावर पंतप्रधान शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये जमा होतात. खरीप हंगामासाठी पावसाळ्यापूर्वी दोन हजार रुपये मिळतील, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती.

Team Agrowon

Palghar News : दर चार महिन्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यावर पंतप्रधान शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये जमा होतात. खरीप हंगामासाठी पावसाळ्यापूर्वी दोन हजार रुपये मिळतील, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती.

मात्र अद्यापही जव्हार तालुक्यातील ११,७५४ शेतकऱ्यांच्या खात्यावर योजनेच्या चौदाव्या हप्त्याचे पैसे जमा झालेले नाहीत. त्यामुळे योजनेचा हप्ता कधी जमा होणार, याची प्रतीक्षा शेतकरी करत आहेत.

केंद्र सरकारकडून दर चार महिन्याला दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होतात. यामध्ये कधीही खंड पडला नव्हता. पीएम किसान योजनेचा चौदावा हप्ता हा ३० मे रोजी जमा होणार होता. त्यामुळे हप्ता जमा झाला का, याची शेतकरी बँकेत चौकशी करतात;

परंतु आता २९ जून उजाडला, तरीही योजनेचा हप्ता जमा झाला नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. सध्या खरीप हंगामासाठी खत, बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांना पैशाची गरज आहे. गेल्या आठवड्यापासून मॉन्सूनने हजेरी लागल्याने पेरणीसाठी लगबग सुरू झाली आहे.

साहित्य खरेदीसाठी मदत

राज्य सरकारने पीएम शेतकरी योजनेच्या नियमानुसारच नमो शेतकरी महासन्मान योजनेतून प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या खात्यावर सहा हजार रुपये जमा करण्याचा निर्णय घेतला; पण ती रक्कम लवकर मिळाल्यास खरीप पेरणी, बियाणे खरेदीसाठी उपयोगात येईल अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे.

योजनेच्या अंमलबजावणीबाबत प्रश्‍नचिन्ह

महाराष्ट्र सरकारकडून नमो शेतकरी महासन्मान योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्षाला सहा हजार रुपये जमा करणार असल्याचे सांगण्यात आले. काही दिवसांपूर्वीच सरकारने नमो शेतकरी महासन्मान योजनेचा आदेश काढला आहे. यामुळे सरकारकडून योजनेची घोषणा होते; परंतु अंमलबजावणीबाबत प्रश्‍नचिन्ह उपस्थित होत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील अपात्र लाभार्थ्यांवर सरकारची कारवाई; अनुदानाची वसुली, तुरुंगवासाचीही शक्यता?

Skill Training Centre: मराठवाड्यात सुरू होणार अत्याधुनिक कौशल्य प्रशिक्षण केंद्र

Bio Tech Farming : ‘के. बी. बायो’च्या वनस्पतिजन्य पीक संरक्षण तंत्रज्ञानाला मान्यता

Land Records Update: जमीन मालकी कायद्याची सिंधुदुर्गातून अंमलबजावणी

Khandesh Rain Update: खानदेशात पावसाची विश्रांती

SCROLL FOR NEXT