Swabhimani Protest Agrowon
कृषी योजना व शासन निर्णय

Crop Insurance : विमा कंपनीविरोधात ‘स्वाभिमानी’चे मुंडण आंदोलन

Crop Insurance News : एचडीएफसी अॅग्रो वीमा कंपनीकडे खरीप पिकांच्या नुकसानीच्या तक्रारी करूनही जिल्ह्यातील हजारो शेतकरी विमा परतव्यापासून वंचित आहेत.

Team Agrowon

Jalna News : एचडीएफसी अॅग्रो वीमा कंपनीकडे खरीप पिकांच्या नुकसानीच्या तक्रारी करूनही जिल्ह्यातील हजारो शेतकरी विमा परतव्यापासून वंचित आहेत. वीमा कंपनीचे शासनाची व शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे.

तिच्या विरोधात फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुंडण आंदोलन करण्यात आले.

जिल्ह्यातील खरीप नुकसान होऊन ८ महिने झाले तरी अद्याप अतिवृष्टी अनुदान शेतकऱ्यांना मिळाले नाही. येणारा खरीप हंगामाच्या मशागती सुरू झाल्या, जिल्हा प्रशासनाने अनुदानवाटप तत्काळ सुरू करावे जेणे करून खरीप हंगामाच्या बी-बियाण्यासाठी तरी अनुदानाचा आधार शेतकऱ्यांना मिळेल आदी मागण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालया समोर सामूहिक मुंडण आंदोलन करण्यात आले.

या वेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश काळे, राज्य कार्यकारिणी सदस्य शिवाजी भोसले, स्वाभिमानी विद्यार्थी परिषदेचे मराठवाडा अध्यक्ष गणेश गावडे, परतूर तालुकाध्यक्ष गणेश राजबिंडे, जिल्हा उपाध्यक्ष अरुण अंभुरे, अंकुश तारख, तात्याराव गोरे, भारत उंडे, काकासाहेब बिडवे, कैलास बिडवे, बालासाहेब बिडवे, बाळासाहेब बिडवे, सुधीरराव बिडवे, संदीप बिडवे, रणजितराव बिडवे, भालेराव गोरे, सीताराम राजबिंडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

अकरा कार्यकर्त्यांनी केले मुंडण

‘स्वाभिमानी’च्या गणेश राजबिंडे, रोहिदास बागल, आसाराम चव्हाण, शिवाजी राजबिंडे, बाळाभाऊ बिडवे, तातेराव गोरे, शिवाजी महाराज भोसले, राजेभाऊ राजबिंडे, विजय राजबिंडे, कैलाश बिडवे, बालुकाका बिडवे यांनी मुंडण केले.

विभागीय आयुक्ताच्या ‘त्या’ प्रस्तावाला मंजुरी द्या

विभागीय आयुक्त सुनील केंद्रकर यांनी शेतकऱ्यांना खरीप व रब्बी पेरणीसाठी प्रति एकरी १०-१० हजार रुपये अनुदान देण्याचा राज्य सरकारला शेतकरी हिताचा जो प्रस्ताव देण्याची भूमिका मांडली आहे. ती शासनाने तत्काळ मंजूर करावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT