धुळे ः वैयक्तिक शेततळे अस्तरीकरणासाठी (Farm Pond Lining) राज्यस्तरावर नोंदणी झालेल्या प्लॅस्टिक फिल्म पुरवठा (Plastic Film Supplier) करणाऱ्या उत्पादक कंपन्यांचे विक्रेते, वितरकांनी जिल्हास्तरावर नोंदणी करणे बंधनकारक असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी एस. डी. मालपुरे यांनी सांगितले.
एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान व राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत सामुदायिक शेततळे व वैयक्तिक शेततळे अस्तरीकरण या घटकांसाठी प्लॅस्टिक फिल्म पुरवठा करणाऱ्या उत्पादक कंपन्यांची राज्यस्तरावर नोंदणी करण्यात आली आहे. या उत्पादक कंपन्यांच्या विक्रेते, वितरकांची जिल्हास्तरावर नोंदणी करणे बंधनकारक आहे. नोंदणीसाठीच्या अर्जाचा विहित नमुना तालुका कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी तसेच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात उपलब्ध आहे.
अर्जासोबत शंभर रुपयांच्या मुद्रांक पेपरवरील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या नावे राष्ट्रीयीकृत किंवा अनुसूचित बँकेची दोन लाख रुपयांची मूळ हमीप्रत व एक छायांकित प्रत, शंभर रुपयांच्या मुद्रांक पेपरवरील नोंदणीच्या अटी व शर्तीबाबत करारनामा, मान्यताप्राप्त उत्पादक कंपनीचे वितरक नोंदणी प्रमाणत्र, वितरक व उत्पादक यांच्यातील करारनाम्याची साक्षांकित प्रत जोडणे आवश्यक आहे.
याशिवाय वितरक दुकान स्थळ, जागेचा ८-अ, ग्रामपंचायत किंवा पालिका मालमत्तापत्रक असा पुरावा, दुकान भाड्याने घेतले असल्यास भाडेकरार व जागामालकाचे नाव असलेला जागेचा उतारा किंवा ग्रामपंचायत पालिका करभरणा पावतीची छायांकित प्रत, दुकान नोंदणी प्रमाणपत्र, आधारकार्ड व बँक पासबुकाची छायांकित प्रत अर्जासोबत सादर करावा, असेही श्री. मालपुरे यांनी नमूद केले.
किसान रॅली संदर्भात पिंपळनेरला बैठक
पिंपळनेर : येथील स्वामी विवेकानंद वाचनालयात भारतीय किसान संघाच्या दिल्ली येथे होणाऱ्या किसान गर्जना रॅली संदर्भात धुळे जिल्ह्याची पत्रकार परिषद किसान संघाचे जिल्हाध्यक्ष साहेबचंद जैन व प्रांत मंत्री सुभाष महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. जिल्हा प्रचारप्रमुख व धुळे जिल्हा रॅली समन्वयक प्रा. शिवप्रसाद शेवाळे, किसान संघाचे माजी जिल्हा कार्यकारणी सदस्य व्ही. एन. जिरेपाटील, जिल्हा मंत्री दुल्हब जाधव, साक्री तालुकाध्यक्ष मधुकर वाघ, तालुका मंत्री जगदीश सोनवणे यांनी स्वामी विवेकानंद वाचनालयात पत्रकार परिषद घेतली. यात दिल्ली येथील किसान गर्जना रॅली ही शेतकऱ्यांना वरदान ठरणार असल्याचे सांगितले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.