Crop Insurance Agrowon
कृषी योजना व शासन निर्णय

Crop Insurance : पीकविमा योजनेला ‘रेकॉर्डब्रेक’ प्रतिसाद

Crop Insurance Scheme : एक रुपया हप्ता भरून पीक विमा संरक्षित करण्याची सोय असताना देखील शेतकऱ्यांचा अपेक्षित प्रतिसाद योजनेला मिळत नव्हता.

Team Agrowon

Nagpur News : एक रुपया हप्ता भरून पीक विमा संरक्षित करण्याची सोय असताना देखील शेतकऱ्यांचा अपेक्षित प्रतिसाद योजनेला मिळत नव्हता. कृषी विभागाने ही बाब गांभीर्याने घेत योजनेच्या शेवटच्या आठवड्यात जागृतीवर भर दिला आणि काय आश्‍चर्य गेल्या खरीप हंगामाच्या तुलनेत ४७८ टक्‍के शेतकऱ्यांचा सहभाग योजनेत झाला. १५ लाख १४ हजार ४८३ खातेदारांपैकी सुमारे १४ लाख २५ हजारांवर शेतकऱ्यांनी आपले पीकविमा संरक्षित केले असून ही मोठी उपलब्धी मानली जात आहे.

पूर्व विदर्भातील नागपूर विभागात नागपूरसह भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर हे जिल्हे धान उत्पादक ओळखले जातात. हमखास पावसाचे, नद्या तसेच प्रकल्प असलेले हे जिल्हे आहेत. परिणामी या भागात हजारो रुपयांचा विमा हप्ता भरून पीक विमा संरक्षित केल्यानंतरही गेल्या काही वर्षात भरपाईच मिळाली नसल्याचा शेतकऱ्यांचा अनुभव आहे.

त्यामुळेच शेतकऱ्यांमधून यंदा एक रुपया इतका प्रीमियम असतानाही योजनेला प्रतिसादच मिळत नव्हता. त्याच कारणामुळे राज्यात नागपूर विभाग योजनेच्या अंमलबजावणीत पिछाडल्याने वरिष्ठ कृषी अधिकाऱ्यांची चिंता वाढली होती. योजनेच्या अखेरच्या टप्प्यात शेतकऱ्यांचे मन वळविण्यासाठी पुढाकार घेण्यात आला. विभागीय कृषी सहसंचालक राजेंद्र साबळे यांनी सहा जिल्ह्यातील अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना प्रोत्साहित केले.

त्यातूनच शेवटच्या आठवड्यात दर दिवशी तब्बल ५० ते ८० हजार शेतकऱ्यांचा सहभाग वाढत गेला. नागपूर विभागातील सहा जिल्ह्यांत शेतकरी खातेदारांची संख्या १५,१४,४८३ इतकी आहे.

२०२२ या वर्षात केवळ २ लाख ९७ हजार ७१५ इतक्‍याच शेतकऱ्यांनी विमा योजनेत सहभाग नोंदविला. यंदा मात्र ही संख्या १४ लाख २५ हजार ७१ इतकी झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ४७८ टक्‍के विमाधारक वाढल्याने कृषी विभागाचा उत्साह देखील वाढीस लागला आहे.

असे आहे जिल्हानिहाय विमाधारक

वर्धा २४५३९९

नागपूर २३३८७५

भंडारा २५५९८८

गोंदिया २३७४६६

चंद्रपूर ३२७२१०

गडचिरोली १२५१३३

६७ हजार शेतकऱ्यांचाच गेल्या हंगामात सहभाग असताना यंदा हा आकडा साडेतीन लाखांवर गेला. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी या सर्वांनी ग्रामपंचायतींना पत्र दिले. गावात दवंडी देण्यात आली. अशा प्रकारच्या जागृतीमुळे विमाधारक शेतकरी संख्येत वाढ झाली आहे.
- शंकर तोटावार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, चंद्रपूर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT