Wheat Procurement Agrowon
कृषी योजना व शासन निर्णय

गव्हाच्या सरकारी खरेदीचे निकष शिथिल करा

उत्पादकता घटल्याने आर्थिक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या मालाला हमीभावाचा लाभ देण्यात यावा. त्यासाठी सरकारी खरेदीचे निकष शिथिल करण्यात यावेत, अशी विनंती पंजाब सरकारने केंद्राला केली आहे.

Team Agrowon

उष्णतेच्या लाटेमुळे पंजाबमधील गव्हाच्या एकरी उत्पादनात घट झाली आहे. उत्पादकता घटल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होणार आहे. अशा परिस्थितीत केंद्र सरकारने सरकारी खरेदीचे नियम शिथिल करावेत, अशी मागणी पंजाब सरकारने केंद्र सरकारकडे केली आहे.

उष्णतेची लाट, कोरड्या हवेच्या माऱ्यामुळे यंदा पिकांमधील आर्द्रतेचे प्रमाण घटले आहे. त्याच यंदा एकरी उत्पादनातही मोठी घट झाली आहे. पंजाब कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार पंजाबमध्ये यंदा ३५ लाख हेक्टर क्षेत्रात गव्हाची लागवड करण्यात आली आहे.

यंदा एकरी १८०० किलो ग्रॅम उत्पादनाचा अंदाज आहे. गेल्यावर्षी राज्यात ३५.५० लाख हेक्टर क्षेत्रात गव्हाची लागवड करण्यात आली होती. एकरी उत्पादनाचे प्रमाण १९४० किलो ग्राम असे होते. यावर्षी पिकांचे एकरी उत्पादन २०० ते ३०० किलोने घटण्याची शक्यता असल्याचा अंदाज कृषी अभ्यासक देविंदर शर्मा यांनी वर्तवला आहे.

मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत हवामान पिकाला अनुकल होते. मात्र पीक शेवटच्या टप्प्यात असताना अचानक तापमान वाढले. पिकांमधील आर्द्रतेचे प्रमाण १० ते २० टक्क्यांनी घटले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईची मागणी केली आहे.

सरकारी खरेदी केंद्रावर आर्द्रतेचे प्रमाण ६ टक्क्यांनी कमी असले तरीही हमीभावाने खरेदी करण्यात येते. याचसंदर्भात बुधवारी (दिनांक १३ एप्रिल) केंद्र सरकारच्या पाच पथकांनी राज्यातील पिकांची पाहणी केली. पिकांचे नमुने संकलित करण्यात आले आहे. प्रयोग शाळांमधील तपासणीनंतर याबाबतचा अहवाल सार्वजनिक केला जाणार आहे. त्यानंतरच या पिकाला हमीभावाचा लाभ देताना नियम शिथिल करण्याबाबतचा निर्णय घेतला जाणार आहे.

दरम्यान उत्पादकता घटल्याने आर्थिक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या मालाला हमीभावाचा लाभ देण्यात यावा. त्यासाठी सरकारी खरेदीचे निकष शिथिल करण्यात यावेत, अशी विनंती राज्य सरकारने केंद्राला केली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Harbhara Tur Kharedi: हरभरा-तूर खरेदीला मुदतवाढ; मेअखेरपर्यंत दिलासा

Jintur Water Shortage: जिंतूर तालुक्यातील ३ गावांना ५ टँकरद्वारे पाणीपुरवठा

Yeola Acid Attack Case: ‘पोलिस मित्र’च निघाला शेतकऱ्यावरील अ‍ॅसिड हल्ल्याचा सूत्रधार

Parbhani Crop Insurance: परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण विमा परतावा द्या: कृषिमंत्री भरणे

Sustainable Farming: शेतकऱ्यांनी शाश्वत शेती पद्धतींचा अवलंब करावा

SCROLL FOR NEXT