PM Kisan Agrowon
कृषी योजना व शासन निर्णय

PM-Kisan Instalment : पीएम किसान योजनेने ओलांडला १० कोटीचा टप्पा : कृषी मंत्रालय

पीएम-किसान या योजनेचा १० कोटी शेतकऱ्यांनी लाभ घेतल्याची माहिती केंद्रीय कृषी मंत्रालयाने सोमवारी (ता.21) दिली. २०१९ च्या पहिल्या हप्त्यानंतर आत्तापर्यंत लाभार्थी संख्येत तिपट्ट वाढ झाली.

टीम ॲग्रोवन

पीएम-किसान या योजनेचा (P Kisan Scheme) १० कोटी शेतकऱ्यांनी लाभ घेतल्याची माहिती केंद्रीय कृषी मंत्रालयाने (Agriculture Department) सोमवारी (ता.21) दिली. २०१९ च्या पहिल्या हप्त्यानंतर आत्तापर्यंत लाभार्थी संख्येत तिपट्ट वाढ झाली. २०१९ साली योजनेचा लाभ ३.१६ कोटी शेतकऱ्यांनी घेतला होता. आत्ता मात्र या योजनेने १० कोटीचा टप्पा ओलांडल्याचा दावा केंद्रीय कृषी मंत्रालयाने केला.

पीएम किसान योजना फेब्रुवारी २०१९ मध्ये सुरू करण्यात आली. या योजनेत केंद्र सरकार शेतकऱ्यांना दरवर्षी तीन हप्त्यात ६ हजार रुपयांची मदत करते. कॉँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी मात्र सरकारची आकडेवारी खोटी असून प्रत्येक हप्त्यानंतर लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या कमी झाली आहे, असा आरोप केला.

कृषी मंत्रालयानुसार, "पीएम किसान योजनेत ३ वर्षात ३ पट्टीने वाढ झाली आहे. त्यामुळे १० कोटी लाभार्थी शेतकऱ्यांचा टप्पा पीएम किसान योजनेने गाठला. पहिल्या हप्त्याच्या वेळी लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या ३.१६ कोटी होती.

" पीएम किसान योजनेचे तीन वर्षे यशस्वी ठरले आहेत. कोट्यावधी गरजू शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यावर २ लाख कोटी रुपये जमा केले आहेत. ज्यामध्ये १.६ कोटी रुपये कोव्हिड-१९ च्या लॉकडाउन दरम्यान पाठवले आहेत, असाही दावा केंद्रीय कृषी मंत्रालयाने केला.

कृषी मंत्रालयाने सांगितले की, "लवकरच पीएम किसान योजनेचा १२ वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे. पीएम किसान योजनेमुळे दर चार महिन्याला शेतकऱ्यांच्या थेट मदत मिळाली. ही योजना देशातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण ठरली आहे. पीएम किसान ही जगातील सर्वात मोठी अशी डीबीटी योजना आहे."

"कुठल्याही मध्यस्थी विना पीएम किसान योजनेचा लाभ पारदर्शक पद्धतीने कोट्यावधी शेतकऱ्यांपर्यंत पोहचला. पीम किसान योजनेत अधिक पारदर्शकता आणण्यासाठी कृषी मंत्रालयाने शेतकऱ्यांचे ई-केवायसी आणि आधार पेमेंटसाठी (एपीबी) वापरून पेमेंट सुरू केल्याचेही कृषी मंत्रालयाने सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Modern Agricultural Machinery: ट्रॅक्टरचलित रोटरी खुरपणी यंत्र

Rice Farming: भात शेतीसाठी ‘एडब्ल्यूडी’ तंत्रज्ञान

First T2T Genome of Pigeonpea : देशातील पहिला 'टी2टी' जीनोम विकसित; तूर उत्पादन वाढीसाठी होणार फायदा

Sugarcane Crop Damage: अतिवृष्टिबाधित लोळलेल्या उसाचे नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना

Artificial Groundwater Recharge: कृत्रिम भूजल पुनर्भरणाचे तंत्रज्ञान

SCROLL FOR NEXT