PM Kisan Agrowon
कृषी योजना व शासन निर्णय

PM Kisan : ‘पीएम किसान सन्मान’ संमेलनाचे आज पंतप्रधानांच्या हस्ते उद्‌घाटन

नवी दिल्ली ः येथील भारतीय कृषी संशोधन संस्थेत दोन दिवसीय ‘पीएम किसान सन्मान संमेलन २०२२’चे पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी (ता. १७) सकाळी उद्‌घाटन करणार आहेत.

टीम ॲग्रोवन

नवी दिल्ली ः येथील भारतीय कृषी संशोधन संस्थेत दोन दिवसीय ‘पीएम किसान सन्मान संमेलन २०२२’चे (PM Kisan Sammelan 2022) पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) सोमवारी (ता. १७) सकाळी उद्‌घाटन करणार आहेत. या कार्यक्रमात देशभरातील १३,५०० हून अधिक शेतकरी आणि सुमारे १५०० अॅग्री स्टार्टअप (Agriculture Startup) एकत्र येणार आहेत, असे शनिवारी (ता. १६) एक अधिकृत निवेदन प्रसिद्ध करण्यात आले.

विविध संस्थांमधून एक कोटींहून अधिक शेतकरी या कार्यक्रमाला आभासी पद्धतीने उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे. या संमेलनात संशोधक, धोरणकर्ते आणि इतर भागधारकांचाही सहभाग असेल. रसायने आणि खते मंत्रालयाच्या अंतर्गत ६०० पंतप्रधान किसान समृद्धी केंद्रांचे उद्‌घाटन पंतप्रधान करणार आहेत.

या योजनेअंतर्गत देशातील खतांची किरकोळ दुकाने टप्प्याटप्प्याने या योजनेमध्ये रूपांतरित केली जातील. याद्वारे शेतकऱ्यांच्या विविध प्रकारच्या गरजा पूर्ण करेल आणि कृषी निविष्ठा (खते, बियाणे, अवजारे) पुरवेल. तसेच माती, बियाणे आणि खतांसाठी चाचणी सुविधा; शेतकऱ्यांमध्ये जागरूकता निर्माण करणार आहे.

विविध सरकारी योजनांबाबत माहिती देणे आणि जिल्हा स्तरावरील दुकानांवर किरकोळ विक्रेत्यांची नियमित क्षमता वाढविणार आहे. त्याचबरोबर ३.३ लाखांहून अधिक किरकोळ खतांची दुकाने या योजनेमध्ये रूपांतरित करण्याची योजना आहे.

या कार्यक्रमामध्ये पंतप्रधान ‘भारतीय जन उर्वरक परियोजना- एक देश एक खत’ योजनेचा प्रारंभ करतील. या योजनेअंतर्गत पंतप्रधान भारत युरिया पिशव्यांचे उद्‌घाटन करतील, ज्यामुळे कंपन्यांना ‘भारत’ या सिंगल ब्रँड नावाने खते बाजारात आणण्यास मदत होणार आहे.

या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी शेतकऱ्यांच्या कल्याणासाठीच्या ‘पंतप्रधान सन्मान योजने’च्या १२ व्या हप्त्याचे १६,००० कोटी रुपये ‘डीबीटी’द्वारे वितरण करणार आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Hawaman Andaj : राज्यातील गारठा कायम; राज्यातील काही भागातील किमान तापमानात काहिशी वाढ

Maharashtra Assembly Election Result 2024 : राज्यात महायुती सुसाट; भाजप १२, शिंदेसेना ८ आणि अजित पवार गटाचे ८ उमेदवार विजयी

Jowar Sowing : कोरडवाहू क्षेत्रातील ज्वारी पेरणीला गती

Goat Farming : आग्रा येथील राष्ट्रीय चर्चासत्रात अकोल्यातील शेळी उत्पादकाचा सन्मान

Fadnavis, Girish Mahajan, Aditi Tatkare and Rane win : महाराष्ट्रात महायुतीची लाट; फडणवीस, मुंडे, गिरीश महाजन, अदिती तटकरेंसह राणे विजय

SCROLL FOR NEXT