PM Kisan agrowon
कृषी योजना व शासन निर्णय

PM Kisan : बार्शी तालुक्यात ४८ हजार ५०५ शेतकऱ्यांना ‘सन्मान’चा निधी

PM Kisan Instalment : राजस्थान येथे आयोजित पंतप्रधानांच्या ‘शेतकरी सन्मान योजने’च्या कार्यक्रमाचे बार्शी येथे शेतकऱ्यांसाठी ऑनलाईन प्रक्षेपण करण्यात आले.

Team Agrowon

Solapur News : राजस्थान येथे आयोजित पंतप्रधानांच्या ‘शेतकरी सन्मान योजने’च्या कार्यक्रमाचे बार्शी येथे शेतकऱ्यांसाठी ऑनलाईन प्रक्षेपण करण्यात आले. कृषी विभाग बार्शी व कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्या वतीने हे आयोजन करण्यात आले.

‘‘या योजनेच्या चौदाव्या हप्त्यामधून ४८ हजार ५०५ शेतकऱ्यांचे २००० रुपये प्रति शेतकरी प्रमाणे तालुक्यात ९ कोटी ७० लाख रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहेत,’’ अशी माहिती तालुका कृषी अधिकारी संतोष कोयले यांनी या वेळी दिली.

पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेच्या चौदाव्या हप्त्याचे ‘एका क्लिकवर थेट बँक खात्यात वितरण’चा कार्यक्रम सिकर (राजस्थान) येथे झाला.

याबाबत जनजागृती होऊन लोकांपर्यंत योजना पोहचावी, या उद्देशाने हा कार्यक्रम झाला. त्यासाठी विभागीय कृषी सहसंचालक रफिक नाईकवाडी, जिल्हा कृषी अधीक्षक दत्तात्रय गावसाने यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कोयले यांच्या नेतृत्वाखाली कृषी सहाय्यकांच्या माध्यमातून कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले.

‘‘‘इ केवायसी’ बाकी असणाऱ्या ७ हजार ५२७ व आधार शेडिंग बाकी असणाऱ्या ५ हजार ४१ शेतकऱ्यांनी त्वरित ई केवायसी व आधार शेडिंग करून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कोयले यांनी केले.

या वेळी आमदार राजेंद्र राऊत, कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन रणवीर राऊत, नगराध्यक्ष असिफ तांबोळी, जि. प. सदस्य मदन दराडे, मुख्याधिकारी बाळासाहेब चव्हाण यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. यशस्वीतेसाठी कृषी अधिकारी नानासाहेब लांडगे, जीवन जगदाळे, भारत मेंहगडे, गणेश पाटील यांनी परिश्रम घेतले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dimbhe Manikdoh Tunnel : डिंभे-माणिकडोह बोगद्यासाठी एकजुटीचा निर्धार

Maharashtra Monsoon : खंडानंतर दोडी परिसरात दमदार पाऊस

NASAKA Sugar Factory : थकीत देण्यांवरून नासाका प्रशासनाच्या रडारवर

Rain Update: कडाक्याच्या उन्हानंतर पहाटेच्या पावसाने दिलासा

Gazette Mismatch : गॅझेटमधील नावे वेगळी, दगड वेगळ्याच ठिकाणी

SCROLL FOR NEXT