Orchard Plantation Agrowon
कृषी योजना व शासन निर्णय

Orchard Plantation : ‘रोहयो’अंतर्गत १४१ हेक्टरवर फळबाग लागवड

Employment Guarantee Scheme : नांदेड जिल्ह्यात महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतर्गत कृषी विभागाकडून २०२३-२४ मध्ये फळबाग लागवड योजना राबविण्यात येत आहे.

Team Agrowon

Nanded News : नांदेड जिल्ह्यात महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतर्गत कृषी विभागाकडून २०२३-२४ मध्ये फळबाग लागवड योजना राबविण्यात येत आहे. यासाठी जिल्ह्याला सातशे हेक्टर फळबाग लागवडीचे लक्षांक देण्यात आले आहे. यात आजपर्यंत १४१.७८ हेक्टरवर लागवड झाल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्राने दिली.

नांदेड जिल्ह्यात रोहयो अंतर्गत विविध यंत्रणांकडे फळबाग लागवडीचे कामे सुरु आहेत. यात कृषी विभागाकडूनही शेतकऱ्यांच्या शेतात तसेच बांधावर विविध प्रकारची फळबाग लागवडीचे कामे केले जातात. यात शेतकऱ्यांना तीन वर्षापर्यंत अनुदान दिले जाते. सन २०२३-२०२४ या वर्षात जिल्ह्याला ७०० हेक्टरवर फळबाग लागवड करण्याचे लक्षांक प्राप्त झाले आहे.

यानुसार आजपर्यंत १४१.७८ हेक्टरवर फळबागेची लागवड झाली आहे. यात आंबा ७६ हेक्टर, सिताफळ १७.४० हेक्टर, पेरू ११.३५, निशिगंध १० हेक्टर, मोसंबी ६.७० हेक्टर, संत्रा ४.३५ हेक्टर, केळी ४.४० हेक्टर, गुलाब ४.७० हेक्टर, चिकू २.९० हेक्टरवर लागवड झाली आहे. दरम्यान रोजगार हमी योजनेतर्गत शेतकऱ्यांना लिंबू, आवळा, चिंच, जांभूळ या फळपिकांची लागवड करता येते. अशी माहिती माहिती कृषी विभागाच्या सूत्राने दिली.

मागीलवर्षी २८३ हेक्टरवर लागवड

जिल्ह्यात मागील वर्षी सन २०२२-२३ मध्ये १५९० हेक्टरवर फळबाग लागवडीचा नियोजन आराखडा मंजूर केला होता. या अंतर्गत जिल्ह्यातील ३५३ शेतकऱ्यांनी २८३ हेक्टरवर फळबागेची लागवड केली आहे.

यात सर्वाधीक आंबा फळपिकांची ११९ हेक्टरवर लागवड केली. तर सिताफळ ३४.६५ हेक्टर, पेरु ३१.९० हेक्टर, चिकू २५.४८ हेक्टर, मोसंबी २२.७० हेक्टर, कागदी लिंबू १८.६० हेक्टर, निशीगंध १०.५० हेक्टर, डाळींब ४.८० हेक्टर, नारळ चार हेक्टर, मोगरा चार हेक्टर, गुलाब ३.८०, तर संत्रा तीन हेक्टर असा एकूण २८३.६ हेक्टरवर फळबाग व फूलबाग लागवड झाली होती.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

E-Peek Pahani: शेतकऱ्यांचं टेन्शन मिटलं! ई- पीक पाहणी प्रक्रियेत मोठा बदल, सहायकांची नियुक्ती, शासन निर्णय जारी

Farmer Fraud: शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करा

Pikvima Scam: पीकविमा अर्जासाठी सीएससी चालकांकडून शेतकऱ्यांची लूट

Dairy Farming: नवतंत्रज्ञानातून दुग्ध उत्पादनात वाढ शक्य

Pik Vima Dharashiv: गतवर्षीच्या खरिपातील पीकविम्याचा मार्ग मोकळा

SCROLL FOR NEXT