Crop insurance Agrowon
कृषी योजना व शासन निर्णय

Crop Insurance : पीकविमा योजनेअंतर्गत २५ टक्के अग्रिम देण्याची अधिसूचना

Agrim Crop Insurance : जिल्ह्यात सोयाबीनचे उत्पादन ५० टक्क्यांपेक्षा जास्त घटण्याची शक्यता तयार झाली होती.

Team Agrowon

Akola News : पंतप्रधान पीकविमा योजनेत सोयाबीन या अधिसूचित पिकासाठी जिल्ह्यातील ५२ महसूल मंडलांत नुकसानग्रस्त विमाधारक शेतकऱ्यांच्या खात्यात २५ टक्के अग्रिम एक महिन्याच्या आत जमा करावा, अशी अधिसूचना जिल्हाधिकारी बी. वैष्णवी यांनी जारी केली आहे.

जिल्हास्तरीय संयुक्त समितीच्या बुधवारी (ता.७) झालेल्या बैठकीतील निर्णयानुसार ही अधिसूचना जारी करण्यात आली आहे. त्यामुळे आता एचडीएफसी इर्गो जनरल इन्शुरन्स विमा कंपनीला एका महिन्याच्या आत कार्यवाही पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत.

जिल्ह्यात सोयाबीनचे उत्पादन ५० टक्क्यांपेक्षा जास्त घटण्याची शक्यता तयार झाली होती. मध्यंतरी कृषी खात्याने पीक नुकसानाचा अंदाज असलेला अहवाल दिला. त्यानंतर हा निर्णय झाला. आता अकोट तालुक्यातील अकोट, मुंडगाव, पणज, चोहोट्टा बाजार, कुटासा, आसेगाव बाजार, उमरा, अकोलखेड, तेल्हारा तालुक्यातील तेल्हारा, माळेगाव बाजार, हिवरखेड, अडगाव बुद्रुक, पाथर्डी, पंचगव्हाण, बाळापूर तालुक्यातील बाळापूर,

पारस, व्याळा, वाडेगाव, उरळ, निंबा, हातरूण, पातूर तालुक्यातील पातूर, बाभूळगाव, आलेगाव, चान्नी, सस्ती, अकोला तालुक्यातील अकोला, घुसर, दहिहांडा, कापशी, उगवा, आगर, बोरगाव मंजू, शिवणी, पळसो, सांगळूद, कुरणखेड, कौलखेड, तसेच बार्शीटाकळी तालुक्यातील बार्शीटाकळी, महान, राजंदा, धाबा, पिंजर, खेर्डा आणि मूर्तिजापूर तालुक्यातील मूर्तिजापूर, हातगाव, निंभा, माना, शेलू बाजार, लाखपुरी, कुरूम, जामठी बुद्रुक या ५२ महसूल मंडलांसाठी ही अधिसूचना लागू होणार आहे.

चालू वर्षी अपेक्षित उत्पादनात मागील ७ वर्षांतील सरासरी उत्पादनाच्या तुलनेत ५० टक्क्यांपेक्षा जास्त घट अपेक्षित असेल तर विमा भरपाईच्या २५ टक्के मर्यादेपर्यंत शेतकऱ्यांना आगाऊ रक्कम देण्याची तरतूद आहे. त्यानुसार ही अधिसूचना काढली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT