Employment Generation Scheme
Employment Generation Scheme Agrowon
कृषी योजना व शासन निर्णय

MNREGA Fund : ‘मनरेगा’ निधी खर्चात नाशिक जिल्हा अव्वल

Team Agrowon

Nashik News : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत (Rural Employment Guarantee Scheme) २०२२-२३ या आर्थिक वर्षात २७.२२ लाख मनुष्य दिवस निर्मिती करून १०१ कोटी इतका निधी खर्च करण्यात आला.

यंदाच्या आर्थिक वर्षात एकूण ४५ हजार ३७५ कामे हाती घेऊन १६ हजार २६८ कामे पूर्ण करण्यात आली असून, उर्वरित २९ हजार १०७ कामे प्रगतिपथावर आहेत.

त्यात मालेगाव, नांदगाव, बागलाण,येवला, पेठ व सुरगाणा तालुक्यांत सर्वाधिक कामकाज झाले आहे. नाशिक महसूल विभागात एकूण पाच जिल्हे असून, यात अहमदनगरमध्ये ८७ कोटी, धुळे ३६ कोटी, नंदुरबार-६९ कोटी, जळगाव-९६ कोटींचा निधी खर्च करण्यात आला आहे.

यामध्ये नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक १०१ कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे.त्यामुळे निधी खर्चात नाशिक जिल्हा विभागात अव्वल ठरला आहे.

पालकमंत्री दादा भुसे,केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी नरेगा योजनेबद्दल आढावा घेऊन योजना प्रत्येक ग्रामपंचायतीत राबविण्याबाबत व जास्तीत जास्त कामे हाती घेणेबाबत निर्देश दिले होते.

६ डिसेंबर २०२२ ला स्थानिक लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत ८०० कामे एकाच दिवशी सुरू करण्यात आली होती.

नरेगाअंतर्गत कोविड काळात व सद्य:स्थितीत सुरगाणा, पेठ, त्र्यंबकेश्वर व इगतपुरी या आदिवासीबहुल तालुक्यांतील मजुरांचे स्थलांतर काहीअंशी रोखण्यात यश आले असून, नांदगाव, येवला, मालेगाव तालुक्यांतील ऊसतोडणीसाठी जाणाऱ्या कुटुंबीयांना लाभ दिल्यामुळे स्थलांतराचे प्रमाण काहीअंशी कमी झाले आहे,अशी माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी (नरेगा) रवींद्र परदेशी यांनी दिली.

नाशिक जिल्ह्याचा नरेगामध्ये तिसऱ्या टप्प्यात समावेश झाला असून, त्याची अंमलबजावणी २००८ पासून सुरू झाली आहे. पंधरा वर्षातील हा सर्वाधिक खर्च यंदाच्या वर्षी झाला आहे. याआधी सर्वाधिक खर्च सन २०१८-१९ या वर्षात झाला असून, तो ७५ कोटी होता.

२०२२-२३ या आर्थिक वर्षात १०१ कोटी खर्च करून आतापर्यंतच्या सर्वाधिक खर्चाचा उच्चांक करण्यात आला आहे. पाच वर्षांचा विचार करता २०१८-१९ मध्ये ७५.८३ कोटी, २०१९-२० मध्ये ५९.९३ कोटी, २०२०-२१ मध्ये ७२.२३ कोटी व २०२१-२२ मध्ये ६४.७२ कोटी व या वर्षी १०१.१९ कोटी इतका निधी खर्च झाला आहे.

जिल्ह्यात आदिवासीबहुल तालुक्यातील व पूर्वेकडील काही तालुक्यांतून रोजगारासाठी नाइलाजाने होणारे स्थलांतर रोखण्यासाठी व ग्रामीण भागात अकुशल हातांना रोजगार देऊन कायमस्वरूपी मालमत्ता निर्माण करण्यासाठी नरेगा ही महत्त्वपूर्ण योजना असून,यात सर्व ग्रामपंचायतींनी सहभाग नोंदवून आपल्या गावाचा सर्वांगीण विकास करावा.
आशिमा मित्तल, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. नाशिक

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Govind Hande: गोविंद हांडे यांचे निधन

Jal Jivan Mission : ‘जलजीवन’ अंमलबजावणीत नाशिक राज्यात अव्वल

Nagar Lok Sabha : नगर दक्षिणेत रडीचा डाव खेळला जातोय

Panand Road : निविदांविनाच मातोश्री पाणंद रस्त्यांची कामे

Kharif Season : खरीप हंगामाचे योग्य नियोजन करा

SCROLL FOR NEXT