Government Scheme Agrowon
कृषी योजना व शासन निर्णय

Government Scheme : एक लाख लोकांना लाभ देण्यासाठी काटेकोर नियोजन करा : जिल्हाधिकारी

Government Yojana Update : या अभियानांतर्गत विविध योजनांच्या माध्यमातून सुमारे एक लाख लोकांना लाभ देण्यासाठी काटेकोर नियोजन करावे.

Team Agrowon

Jalna News : शासकीय योजना लोकाभिमुख करून त्यांची अंमलबजावणी गतिमान करण्यासाठी ‘‘जत्रा शासकीय योजनांची -सर्व सामान्यांच्या विकासाची’’ या अभियानाला सर्व विभागप्रमुखांनी गती देऊन जालना जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांना लाभ द्यावा.

हे अभियान १५ जून २०२३ पर्यंत राबविण्याचे शासनाने ठरविले आहे. या अभियानांतर्गत विविध योजनांच्या माध्यमातून सुमारे एक लाख लोकांना लाभ देण्यासाठी काटेकोर नियोजन करावे. याच महिन्यात तालुकानिहाय शिबिरे आयोजित करून लाभार्थ्यांना लाभ देण्यात यावा, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड (Collector Dr. Vijay Rathod) यांनी केल्या.

जत्रा शासकीय योजनांची-सर्व सामान्यांच्या विकासाची या अभियानाच्या अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आज आढावा बैठक घेण्यात आली.

बैठकीस जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना, अपर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे उपजिल्हाधिकारी रवींद्र परळीकर, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, उपजिल्हाधिकारी संगीता सानप यांच्यासह सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड म्हणाले, की १५ जूनपर्यंत चालणारे ‘‘जत्रा शासकीय योजनांची -सर्व सामान्यांच्या विकासाची’’ शासनाचे हे महत्वाकाकांक्षी अभियान असून अभियान यशस्वी करण्यासाठी सर्व विभागप्रमुखांनी जबाबदारीने व दक्षतेने उत्तम नियोजन करावे.

उद्दिष्टानुसार योजनानिहाय लाभार्थ्यांची निवड करून त्याची अद्ययावत माहिती जिल्हा प्रशासनाकडे विहित नमुन्यात तातडीने सादर करावी. या मे महिन्यात लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी तालुकानिहाय लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत शिबिरांचे आयोजन करावे, असेही ते म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Survey : २३ हजार गावांमध्ये नुकसानीचे सर्वेक्षण पूर्ण; मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली माहिती

PM Dhan Dhaanya Krishi Yojana: सर्वोत्कृष्ट १० जिल्ह्यांत छत्रपती संभाजीनगर

Goat Pregnancy Diagnosis: शेळी, मेंढीमधील गर्भनिदान

Tick Infestation Management: गोठ्यातील गोचीड प्रादुर्भावाचे नियंत्रण

Uzzi Fly Management: उझी माशी व्यवस्थापनासाठी निसोलीनक्स थायमसचा वापर

SCROLL FOR NEXT