Sugarcane Labor Agrowon
कृषी योजना व शासन निर्णय

Sugarcane Labor Insurance : दहा लाख ऊसतोड कामगारांना पाच लाखांचे विमा संरक्षण

राज्यातील ऊसतोड कामगारांच्या कल्याणासाठी लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळार्फत येत्या काळात अधिकाधिक योजनांचा लाभ देण्यात येणार आहे.

Team Agrowon

Sugarcane News पुणे : राज्यातील ऊसतोड कामगारांच्या (Sugarcane Labor) कल्याणासाठी लोकनेते गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) ऊसतोड कामगार कल्याण महामंडळार्फत येत्या काळात अधिकाधिक योजनांचा लाभ देण्यात येणार आहे.

त्यासाठी ऊसतोड कामगारांच्या सर्वांगीण विकासासाठी कालबद्ध कार्यक्रम तयार करून असून दहा लाख ऊसतोड कामगारांना पाच लाख रुपयांचे विमा संरक्षणाची अंमलबजावणी करण्याचे निर्देश महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. प्रशांत नारनवरे यांनी महामंडळाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत.

सी.आय.टी.यू. संलग्न महाराष्ट्र ऊसतोडणी व वाहतूक कामगार संघटनेच्या राज्यातील पदाधिकारी यांच्या शिष्टमंडळाची ऊसतोड कामगारांच्या विविध प्रश्‍नांबाबत पुण्यात गुरुवारी (ता. ९) बैठक आयोजित करण्यात आली होती.

त्याप्रसंगी आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी माहिती दिली आहे. या वेळी संघटनेचे राज्य अध्यक्ष डॉ. डी. एल. कराड, समाज कल्याण विभागाचे उपायुक्त रवींद्र कदम पाटील, प्रादेशिक उपायुक्त बाळासाहेब सोळुंकी, सहायक संचालक मारुती मुळे, प्रा. डॉ. सुभाष जाधव, प्रा. आबासाहेब चौगुले, नामदेव राठोड, सय्यद रजा, अंगत खरात, आनंदा डाफळे, पांडुरंग मगदूम, रामचंद्र कांबळे, किशोर राठोड आदी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Tractor Heating in Summer: उन्हाळ्यात ट्रॅक्टर गरम होतोय? देखभालीच्या सोप्या ७ टिप्स!

Power Supply Issues: धान पिकाला विजेचा फटका

Weekly Market Issue: धाड आठवडी बाजार प्रश्नावर आंदोलनानंतर प्रशासनाचे आश्वासन

Flood Fishermen Compensation: पूरग्रस्त मत्स्य व्यावसायिकांना चार कोटींची भरपाई मंजूर

CPIM Protest: बीड जिल्ह्यात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची निदर्शने

SCROLL FOR NEXT