Jaljeevan Mission Agrowon
कृषी योजना व शासन निर्णय

Water Recourses : पाण्याच्या स्रोतांसाठी तपासणी मोहीम

जलजीवन मिशन अंतर्गत जिल्ह्यात विविध उपक्रम राबविणे सुरू आहे. अनुषंगाने जिल्ह्यात सर्व शाळा, अंगणवाडीतील पाण्यांचे नमुने प्रयोगशाळेस पाठविले जाणार आहे.

Team Agrowon

बुलडाणा : शुद्ध व सुरक्षित पिण्याचे पुरेसे पाणी, घरोघरी नळ जोडणी देण्यासाठी जलजीवन मिशन (Jaljeevan Mission) अभियानांतर्गत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते यांच्या मार्गदर्शनात १ डिसेंबरपासून ‘स्वच्छ जल से सुरक्षा’ हे अभियान राबविण्यात येत आहे. आता पिण्याच्या पाण्याच्या (Drinking Water) स्रोतांची तपासणीसाठी मोहीम राबविण्यात येत आहे.

जलजीवन मिशन अंतर्गत जिल्ह्यात विविध उपक्रम राबविणे सुरू आहे. अनुषंगाने जिल्ह्यात सर्व शाळा, अंगणवाडीतील पाण्यांचे नमुने प्रयोगशाळेस पाठविले जाणार आहे.

तसेच ग्रामपंचायतीमधील पिण्याच्या पाण्याचे स्रोतांची फील्ड टेस्ट किटद्वारे तपासणी करण्यासाठी एक दिवसीय मोहीम राबविण्यात येणार आहे.

त्यासाठी गावातील उपलब्ध पाण्याच्या स्रोतांची तपासणी गावातच पूर्ण करण्यासाठी पाणी गुणवत्ता कक्षांतर्गत प्रत्येक ग्रामपंचायतीला फिल्ड टेस्ट किट पुरविण्यात आली आहेत.

सदर किटद्वारे जैविक व रासायनिक तपासणी करता येणार आहे. पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिवशंकर भारसाकळे, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता राहुल जाधव यांच्या नियंत्रणात प्रति ग्रामपंचायत पाच महिला याप्रमाणे जिल्ह्यातील एकूण ४३५० महिलांना, प्रती ग्रामपंचायत एक जल सुरक्षक याप्रमाणे जिल्ह्यातील ८७० जलसुरक्षकांना व जिल्ह्यातील सर्व ग्रामसेवकांना देखील सदर तपासणी बाबतचे प्रशिक्षण देण्यात आलेले आहे. ग्रामसेवकांनी आपल्या ग्रामपंचायतीमधील फिल्ड टेस्ट किट तपासणीचे संनियंत्रण करावयाचे आहे.

ही महत्त्वाची मोहीम यशस्वी करण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीने सहभागी होऊन आपल्या गावातील सर्व पाणी नमुन्यांची तपासणी करावी व त्याच्या नोंदी संकेतस्थळावर कराव्यात.
भाग्यश्री विसपुते, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, बुलडाणा

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Lalya: कपाशीवर लाल्याचा प्रादुर्भाव? योग्य कारण ओळखूनच करा उपाय

Water Storage Crisis: सांगली जिल्ह्याच्या जलसाठ्यावर संकटाचे ढग

Indian Railways : अहिल्यानगर-बीड रेल्वे प्रवास होणार सुपरफास्ट

Toll Waiver: गणेशभक्तांसाठी आनंदाची बातमी, यंदाही टोलमाफी, पास उपलब्ध

Devlali Danapur Express : देवळाली-दानापूर शेतकरी समृद्धी रेल्वेची १०० वी फेरी पूर्ण

SCROLL FOR NEXT