Agriculture News  Agrowon
कृषी योजना व शासन निर्णय

Animal Husbandry Subsidy : पशुपालनासाठी वैयक्तिक पातळीवर मिळवा १० लाखांपर्यंतचे अनुदान

Agriculture Scheme : पशुपालनासाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजना असून, शेतीला पूरक आणि शाश्‍वत व्यवसाय म्हणून शेतकऱ्यांनी पशुपालनाकडे वळावे.

Team Agrowon

Pune News : पशुपालनासाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजना असून, शेतीला पूरक आणि शाश्‍वत व्यवसाय म्हणून शेतकऱ्यांनी पशुपालनाकडे वळावे. यासाठी विविध योजनांद्वारे वैयक्तिक पातळीवर ४५ प्रकारचे उद्योग असून, यासाठी १० लाखांचे अनुदान तर शेतकरी गटाद्वारे उद्योग उभारल्यास तीन कोटी रुपयांपर्यंत अनुदान असल्याची माहिती कृषी विभागाचे अधिकारी पी. टी. काळे यांनी दिली.

पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या वतीने (कात्रज दूध) अध्यक्ष भगवान पासलकर यांच्या सूचनेनुसार पशुपालक शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये शेतकऱ्यांसाठी केंद्र शासनाच्या गाय गोठ्याच्या उभारणीसाठी अनुदान योजनेची माहिती व बँकेच्या सुविधांबद्दल चर्चा करण्यात आली. संघाचे या मेळाव्यास पुणे जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकरी उपस्थित होते.

मेळाव्यात कृषी विभागाचे पी. टी. काळे यांनी पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेअंतर्गत ४५ प्रकारच्या वैयक्तिक उद्योग योजनांची माहिती दिली. ते म्हणाले, ‘‘वैयक्तिक पातळीवर उभा करता येणाऱ्या उद्योगांसाठी केंद्र शासनाकडून प्रकल्प किमतीच्या ३५ टक्के अनुदान दिले जाते.

त्यामध्ये वैयक्तिक पातळीवर उद्योग उभा केल्यास अनुदानाची किंमत १० लाख रुपयांपर्यंत आहे. तेच उद्योग महिला बचत गटातून शेतकरी गटातून विविध सहकारी संस्थेतून उद्योग उभा केल्यास अनुदानाची रक्कम ३ कोटीपर्यंत असून त्यातून उत्पादित झालेल्या उत्पादनाचे मार्केटिंग व ब्रँडिगसाठी लागणाऱ्या एकूण खर्चाच्या ५० टक्के रक्कम शासनाकडून अनुदानात देण्यात येते. या योजनांचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा.’’

यावेळी दूध संघाचे उपाध्यक्ष राहुल दिवेकर, संचालक गोपाळराव म्हस्के, कालिदास गोपाळघरे, वैशाली गोपाळ घरे यांच्यासह कुमार मारणे, अर्चना नरुटे, माधव कोकाटे तसेच पुणे जिल्ह्याच्या विविध दूध संघाचे, संस्थांचे, अध्यक्ष व बँकाचे पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमार मारणे यांनी केले. आभार कालिदास घरे यांनी मानले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Forest Rights Farmers Issue: वनहक्क पट्टेधारक शेतकरी ‘ॲग्रीस्टॅक’वरून ‘गायब’

Agriculture Inspection: पीक पाहणीचा पाठपुरावा करावा; ‘महसूल’च्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

Tobacco Streak Virus: कापसावर तंबाखू स्ट्रिक विषाणू ओळखा! नियंत्रणाचे उपाय काय?

Onion Farmers Issue: ‘बफर स्टॉक’चा कांदा शेतकऱ्यांच्या मुळावर

Sugarcane Transport Rule: ऊस वाहतुकीमध्ये बैलांना क्रूर वागवू नका; साखर आयुक्तालयाच्या कारखान्यांना सूचना

SCROLL FOR NEXT