Crop Insurance  Agrowon
कृषी योजना व शासन निर्णय

Crop Insurance : पीकविम्यासाठी चार लाख शेतकऱ्यांची नोंद

Crop Insurance In One Rupee : शासन या हंगामासाठी राबवत असलेल्या पंतप्रधान पीकविमा योजनेत आतापर्यंत चार लाख शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. यावर्षीपासून एक रुपयात विमा काढण्याची सुविधा देण्यात आली आहे.

Team Agrowon

Buldana News : शासन या हंगामासाठी राबवत असलेल्या पंतप्रधान पीकविमा योजनेत आतापर्यंत चार लाख शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. यावर्षीपासून एक रुपयात विमा काढण्याची सुविधा देण्यात आली आहे. याला शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

३१ जुलैपर्यंत पीकविमा काढण्याची मुदत असून आतापर्यंत चार लाख १० हजार ५७८ शेतकऱ्यांनी पीकविमा काढला आहे. सुमारे साडेपाच लाख शेतकऱ्यांची पीकविम्यासाठी नोंदणी करण्याचे उद्दिष्ट असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. ह. पि. तुम्मोड यांनी सांगितले.

याबाबत बोलताना जिल्हाधिकारी डॉ. तुम्मोड म्हणाले, की गेल्या वर्षीत पीकविमा कंपनीचा अनुभव पाहून यावेळचे नियोजन करण्यात आले आहे. सध्या शेतकऱ्यांनी पीकविमा काढण्यासाठी पुढे येणे गरजेचे आहे.

आधारकार्ड, पॅन आणि बँकेची माहिती यावरून पीकविम्याची कार्यवाही करण्यात येत आहे. शेतकऱ्यांमध्ये जागृती व्हावी, यासाठी तीन वाहनाद्वारे प्रचार सुरू आहे. तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती आणि कॉमन सर्व्हिस सेंटरवर पीकविमा काढण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

शेतकऱ्यांना माहिती देण्यासाठी सर्व सरपंचांना पत्र देण्यात आले आहे. यावर्षीच्या खरीप पिकाची परिस्थिती सध्यःस्थितीतील पावसामुळे चांगली झाली आहे. जिल्ह्यात ९८ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे.

त्या कपाशीचे नमुने तपासणीसाठी नागपूरला

जिल्ह्यात काही ठिकाणी कपाशीवर लाल्या रोग आल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या. मात्र, एवढ्या लवकर कपाशीवर लाल्या रोग पडत नाही. कृषी शास्त्रज्ञांच्या मते आवश्यक अन्नद्रव्ये मिळाले नसल्याने पिकाची पाने लाल पडत आहेत.

याबाबत कृषी विद्यापिठाचा चमू येऊन पाहणी करणार आहेत. तसेच पिकांचे नमुने नागपूर येथे पाठविण्यात आले असल्याचेही जिल्हाधिकारी डॉ. तुम्मोड यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Assessment : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

SCROLL FOR NEXT