Well Scheme Agrowon
कृषी योजना व शासन निर्णय

Agriculture Well Scheme : शेतकऱ्यांना मिळणार अधिकाधिक सिंचन विहिरी

Agriculture Irrigation : खामगाव मतदार संघातील शेतकऱ्यांना आता मोठ्या प्रमाणात रोजगार हमी योजनेमार्फत विहिरी मिळणार आहेत.

Team Agrowon

Buldana News : खामगाव मतदार संघातील शेतकऱ्यांना आता मोठ्या प्रमाणात रोजगार हमी योजनेमार्फत विहिरी मिळणार आहेत. आमदार ॲड. आकाश फुंडकर यांनी विधानसभेत उपस्थित केलेल्या प्रश्नावर रोहयोमंत्री संदीपान भुमरे यांनी याबाबत माहिती दिली.

महाराष्ट्र विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात बुधवारी (ता.१९) आमदार फुंडकरांनी रोहयोमार्फत होणाऱ्या सिंचन विहिरींचा प्रश्न विधानसभा सभागृहात उपस्थित केला होता.

यावेळी आमदर फुंडकर यांनी खामगाव मतदार संघात पाणलोट क्षेत्रातील केवळ २७ गावांमध्येच रोजगार हमी योजनेमार्फत शेतकऱ्यांना सिंचन विहिरी मिळतात. अनेक जाचक अटी व शर्ती असल्याने शेतकऱ्यांना विहिरी मिळत नाहीत.

सर्वात मोठी चूक शासनाच्या जीएसडी विभागाच्या चुकीच्या सर्वेक्षणामुळे झाली असल्‍याचे लक्षात आणून दिले. तसेच प्रत्यक्ष गाव व शिवारात पाहणी करून सर्वे करायला हवा. परंतु हे सर्वेक्षण कार्यालयात बसून केल्या गेले असल्याचे आमदार फुंडकर यांनी सांगितले.

याला सकारात्मक प्रतिसाद रोहयोमंत्री भुमरे यांनी दिला. तसेच नव्याने वस्तुनिष्ठ सर्वेक्षण करून, काही जाचक अटी रद्द करणार आणि अधिकाधिक गावे या योजनेत बसतील अशी तरतूद करण्याची ग्‍वाही दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rice Crop Update: पावसाची उघडीप; भात पिके वाढीच्या अवस्थेत

Farmer Loan Waiver: वनपट्टाधारक, वारसांना मिळणार कर्जमाफी

Potato Crop Damage: पावसाअभावी बटाटा पीक करपले; पंचनाम्यांची मागणी

Ganesh Festival: गणरायाचे उत्साहात आगमन

Silk Farming: ‘सॉइल टू सिल्क’मधून मूल्यसाखळी उभारणी

SCROLL FOR NEXT