Crop insurance Agrowon
कृषी योजना व शासन निर्णय

Crop Insurance : पीकविम्यासाठी शेतकऱ्यांना ‘तारीख पे तारीख’

नुकसानाची माहितीही विमा कंपनीला कळविली. मात्र दिवाळी उलटूनही विमा कंपनीकडून लाभासाठी शेतकऱ्यांना ‘तारीख पे तारीख’ दिली जात असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

टीम ॲग्रोवन

वर्धा : अतिवृष्टी यंदा नुकसान (Heavy Rain Crop Damage) झाले. नुकसानाची भरपाई (Crop Damage Compensation) मिळावी, यासाठी जिल्ह्यात २७ हजार शेतकऱ्यांनी पीकविमा (Crop Insurance) उतरविला. नुकसानाची माहितीही विमा कंपनीला कळविली. मात्र दिवाळी उलटूनही विमा कंपनीकडून लाभासाठी शेतकऱ्यांना ‘तारीख पे तारीख’ दिली जात असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

कधी नव्हे एवढा पाऊस यंदा जिल्ह्यात पडला. त्यामुळे नदीनाल्यांच्या काठांवरील शेतजमिनी खरडून गेल्या. तर पावसामुळे जवळपास अडीच लाख हेक्टरवरील पिकांना याचा मोठा फटका बसला. यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यातील एकूण २७ हजार दोन शेतकऱ्यांनी आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्शुरन्स कंपनीकडून पीकविमा उतरविला आहे.

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी घटना घडल्यापासून ७२ तासांच्या आत नुकसानीची पूर्वसूचना संबंधित विमा कंपनीला देणे आवश्यक आहे. त्याप्रमाणे शेतकऱ्यांनी पीकविमा कंपनीच्या नियुक्त कर्मचाऱ्यांनी सहकार्य करीत माहिती कंपनीकडे सादर केली. नुकसानीचे पंचनामे झाले. पीकपाहणी झाली. दिवाळीपूर्वी नुकसानीचा परतावा जमा करण्यात येईल, असा विश्‍वास कृषी विभागाने दिला. दिवाळी गोड होईल, या आशेवर शेतकरी होते. मात्र प्रत्यक्षात दिवाळी उलटली तरी विमा परतावा मिळालेला नाही.

दिवाळी गेली अंधारात

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी मदतीची रक्कम दिवाळीपूर्वीच देण्याचा दावा राज्य सरकारतर्फे करण्यात आला होता. राज्य शासनाच्या वतीने देण्यात येणारी रक्कम वगळता पीकविमा कंपनीकडून मिळणारी रक्कम शेतकऱ्यांसाठी बोनस ठरणार होती. परंतु प्रत्यक्षात दिवाळीचा उत्सव संपल्यावरही शेतकऱ्यांच्या खात्यात दोन्ही रकमा जमा न झाल्याने हजारो शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात गेली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pune Rainfall: पुणे जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला

MKCL Investment: ‘एमकेसीएल’ने सरकारमध्ये गुंतवणूक करावी; शरद पवार यांची अपेक्षा

Market License Cancellation: पणन संचालकांचा खासगी बाजारांवर कारवाईचा धडाका; ‘रामेश्वर, ‘कसमादे’, ‘जय गजानन’ बाजारांचे परवाने रद्द

Indigenous Livestock Breeds: सोळा नव्या देशी पशुजातींना मान्यता

Agro-Service Federation's Protest: प्रस्तावित आकृतिबंधाविरोधात कृषी सेवा महासंघाचे आंदोलन

SCROLL FOR NEXT