Agriculture Scheme
Agriculture Scheme Agrowon
कृषी योजना व शासन निर्णय

Agriculture Scheme : कृषी योजनांचा लाभ घेऊन शेतकऱ्यांनी प्रगती करावी

टीम ॲग्रोवन

जालना : आत्मनिर्भर भारत (Atmanirbhar Bharat) अभियानांतर्गत राबविली जाणारी कृषी पायाभूत निधी योजना (Agriculture Scheme) शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. कृषी योजनांचा लाभ घेऊन शेतकऱ्यांनी प्रगती करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी केले.

आत्मनिर्भर भारत अभियानांतर्गत राबविली जाणारी कृषी पायाभूत निधी योजनेची माहिती शेतकऱ्यांना व्हावी यासाठी आत्माच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात मंगळवारी (ता. १३) कृतिसंगम कार्यशाळा घेण्यात आली. त्यावेळी जिल्हाधिकारी राठोड बोलत होते.

आत्माच्या प्रकल्प संचालक शीतल चव्हाण, कृषी विज्ञान केंद्राचे विषयतज्ज्ञ शशिकांत पाटील, नाबार्डचे तेजल क्षीरसागर, स्मार्ट प्रकल्पाचे नोडल अधिकारी श्रीकांत देशपांडे, जिल्हा अग्रणी बँकचे श्री. तायडे, रेशीम विकास अधिकारी अजय मोहिते, दत्तात्रय सूर्यवंशी, शरद उंदरे उपस्थित होते.

जिल्हाधिकारी राठोड म्हणाले, की जालना जिल्ह्याची अर्थव्यवस्था ही प्रामुख्याने कृषी आणि कृषी उद्योगांवर आधारित आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हितासाठी विविध कृषीविषयक योजना जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यात येतात. आत्मनिर्भर भारत पायाभूत निधी योजनेंतर्गत कापणी हंगामानंतरचे व्यवस्थापन, पायाभूत सोयी-सुविधा आणि सामुदायिक शेती मालमत्तांसाठी पूरक प्रकल्पांमध्ये गुंतवणुक करण्याकरिता मंजूर कर्जावरील व्याज अनुदान व आर्थिक साहाय्याद्वारे मध्यम दीर्घ मुदतीसाठी मध्यम-दीर्घ कर्जपुरवठा सुविधा उपलब्ध करून देण्यात येतात.

कृषी पायाभूत निधी योजनेंतर्गत प्राथमिक कृषी पत संस्था, विपणन सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक संघटना, स्वयंसहायता गट, शेतकरी, संयुक्त दायित्व गट, शेतकरी, संयुक्त दायित्व गट, बहुउद्देशीय सहकारी संस्था, कृषी-उद्योजक, स्टार्टअप्स, एकत्रित अभियानांतर्गत राबविली जाणारी कृषी पायाभूत सुविधा पुरविणारे केंद्र व राज्य संस्था किंवा स्थानिक संस्था पुरस्कृत सार्वजनिक खासगी भागीदारी प्रकल्प यांना कर्ज देण्यात येते.

कृषी आणि कृषी प्रक्रिया आधारित उपक्रमांना औपचारिक वित्त पुरवठा करणाऱ्या या योजनेमुळे जालना जिल्ह्यात रोजगाराच्या असंख्य संधी निर्माण होतील. कार्यशाळेत शीतल चव्हाण यांनी ‘पोकरा’ योजनेबाबत, अजय मोहिते यांनी रेशीम लागवडीबाबत मार्गदर्शन केले. शशिकांत पाटील यांनी कृषी उत्पादनावर आधारित प्रक्रिया उद्योगांची सविस्तर माहिती दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rice Research : अधिक ‘बी१’ जीवनसत्त्व असलेला भात विकसित

Waghad Project : ‘वाघाड’ने घडविला कायापालट

Water Crisis : सोलापूर जिल्ह्यात १०२ गावांना टँकरने पाणी सुरू

Road Work Update : पाणंद रस्त्यांची ८५० हून अधिक कामे ठप्प

Mathadi Worker Protest : माथाडी कामगारांचे सरणावर बसून आंदोलन

SCROLL FOR NEXT