Crop Insurance Agrowon
कृषी योजना व शासन निर्णय

Crop Insurance : पीकविमा तत्काळ मिळण्यासाठी शेतकरी आक्रमक

विमा कंपनीचे अधिकारी सर्व जागांवर पोहोचत नसून अनेक शेतकऱ्यांनी तक्रार करूनही त्यांना लाभ मिळत नाही. संबंधित अधिकारीही फोन उचलत नाहीत, असा आरोप आंदोलकांनी या वेळी केला.

टीम ॲग्रोवन

सटाणा, जि. नाशिक : तालुक्यातील बहुतांश अनेक शेतकरी सध्या पीकविमा (Crop Insurance) भरपाईपासून (Crop Damage Compensation) वंचित असून प्रत्येक विमाधारक शेतकऱ्यास भरपाई रक्कम मिळावी या मागणीसाठी भारतीय जनता पक्ष किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष बिंदू शर्मा यांच्या नेतृत्वाखाली संतप्त शेतकऱ्यांनी येथील तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या दालनात ठिय्या आंदोलन छेडले. नायब तहसीलदार बी. जी. बहिरम आणि कृषी अधिकारी सुधाकर पवार यांना या वेळी निवेदन देण्यात आले.

हवामान खराब असल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले. यावर्षी कृषी विभागाने पंचनामे न करता संबंधित विमा कंपनीकडे तक्रार नोंदवून त्या कंपनीचे अधिकारी आपल्या शेतात येऊन पंचनामा करून विमा रक्कम देण्याचे निश्चित करतील, असे धोरण जाहीर केले. विमा कंपनीचे अधिकारी सर्व जागांवर पोहोचत नसून अनेक शेतकऱ्यांनी तक्रार करूनही त्यांना लाभ मिळत नाही. संबंधित अधिकारीही फोन उचलत नाहीत, असा आरोप आंदोलकांनी या वेळी केला.

तालुक्यात फळबागाही जास्त प्रमाणात असून शेतकऱ्यांनी या फळबागांचाही विमा काढला आहे. ठिकठिकाणी ढगफुटीसदृश स्थितीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले. शासनाने लावलेले ट्रिगर (पाणी मोजणी यंत्र) ज्या ठिकाणावर आहेत त्या ठिकाणावर पाणी पडले नाही, मात्र त्याच्या जवळपास मोठ्या प्रमाणात पाऊस पडला. तरीही त्या शेतकऱ्यांना नुकसानीचा लाभ मिळत नाही. त्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांची फसवणूक केली जात आहे, अशी तक्रार मांडण्यात आली.

आंदोलनात सुधाकर पाटील, संजय सूर्यवंशी, दीपक ठोके, नंदकिशोर शेवाळे, केतन सोनवणे, दिलीप भामरे, जालिंदर देवरे, भिला पवार, सदाशिव इंगळे, गोकुळ गांगुर्डे, हेमंतराव पगार, नाना जाधव, रमाबाई जाधव, प्रतिभा जाधव, बाजीराव ढेपले, भरत गांगुर्डे, बाळू गांजे, अमृत देवरे आदी सहभागी झाले.

विमा कंपनीने तत्काळ मदत द्यावी

शेतकऱ्यांनी वेळोवेळी केलेल्या तक्रारी आणि त्या तक्रारीवर विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी केलेला पंचनामा आणि त्या नुकसानीपोटी मिळालेली मदत तुटपुंजी असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

ही मदत कुठल्या निकषावर दिली जात आहे, ही मदत एक प्रकारची फसवणूक असून तत्काळ योग्य ती आर्थिक मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी. पात्र शेतकऱ्यांना विमा कंपनीने तत्काळ मदत द्यावी; अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Orange Fruit Drop: शुक्लकाष्ठ फळगळीचे!

Pimpalapur Farmer Death Assistance: पिंपळापूर येथील आत्महत्याग्रस्त कुटुंबाची प्रशासनाकडून भेट; शासकीय योजनांचा लाभ देण्याची कार्यवाही

New Gram Panchayat Schemes: ग्रामपंचायतींसाठी पाच नव्या योजनांना मंजुरी

Cibil Score Issue: कर्जमुक्ती योजनेमुळे सिबिल स्कोअरवर परिणाम : तुपकर

Farmer Protest Warning: ‘डीबीटी’साठी शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

SCROLL FOR NEXT