KYC Update Agrowon
कृषी योजना व शासन निर्णय

KYC Update : ऐंशी वर्षीय महिलेची प्रलंबीत ई-केवायसी यशस्वी

Pm kisan Scheme Update : नांदेड जिल्ह्यात शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळण्यासाठी ई-केवायसी करणे बंधनकारक केले आहे. सध्या कृषी विभाग या कामासाठी मोहीम राबवून काम करीत आहे.

Team Agrowon

Nanded News : नांदेड जिल्ह्यात शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळण्यासाठी ई-केवायसी करणे बंधनकारक केले आहे. सध्या कृषी विभाग या कामासाठी मोहीम राबवून काम करीत आहे.

नेरली येथील ऐंशी वर्षीय महिलेची ई-केवायसी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात तंत्र अधिकारी (सांखिकी) प्रमोद गायके यांनी केली. यामुळे त्या महिलेच्या चेहऱ्यावर समाधान व्यक्त होत होते.

नांदेड जिल्ह्यात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतर्गत चार लाखापेक्षा अधिक शेतकरी कुटुंबाला दरवर्षी सहा हजार रुपयांचा लाभ देण्यात येतो. यंदा राज्य शासनाने याला जोड देवून नमो महासन्मान निधी योजनेची सुरवात करून केंद्राप्रमाणे वर्षाला सहा हजार देण्याची योजना हाती घेतली आहे.

मागील आठ दिवसात दहा हजारापेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्याचे ई-केवायसी करण्याचे काम पूर्ण झाले आहे. एक वृद्ध महिला केवळाबाई देविदास अण्णापूर्वे रा. नेरली (ता. जि. नांदेड) यांच्या खात्याची ई-केवायसी प्रलंबित असल्यामुळे त्यांना योजनेचा लाभ मिळत नव्हता.

कोणाच्यातरी सांगण्यावरून त्या नांदेड जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात आल्या. त्यांच्या एकुलत्या एक मुलाचे कमी वयात अपघाती निधन झाल्यामुळे त्यांना पीएम किसान योजनेच्या भक्कम आधाराची गरज होती. त्यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी भेट घेऊन अडचण सांगितली.

त्यांनी लगेच तंत्र अधिकारी (सांखिकी) प्रमोद गायके यांना ई-केवायसी संदर्भात सूचना दिली. गायके यांनी त्यांची फेस अथेंकेटीशन ॲपद्वारे ई-केवायसी करून दिली. यासोबतच त्यांच्या बँक खात्याचेआधार संलग्न करण्यासाठी संबंधित बँकेस पत्र व्यवहार करण्यात आला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT