Crop Insurance Agrowon
कृषी योजना व शासन निर्णय

Crop Insurance Scheme : पीकविमा योजनेत सहभागी होण्यासाठी ३१ जुलैपर्यंत मुदत

Crop Insurance : योजनेअंतर्गत सोयाबीन, मूग, उडीद, तूर, कापूस व ज्वारी इत्यादी पिकांसाठी शेतकऱ्यांनी पीकविमा योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत ३१ जुलै आहे.

Team Agrowon

Akola News : जिल्ह्यात पंतप्रधान पीकविमा योजना खरीप हंगाम व रब्बी हंगामात राबविण्याबाबत येणार आहे. योजनेअंतर्गत सोयाबीन, मूग, उडीद, तूर, कापूस व ज्वारी इत्यादी पिकांसाठी शेतकऱ्यांनी पीकविमा योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत ३१ जुलै आहे.

अंतिम दिनांकापूर्वी अधिकाधिक शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी केले आहे. अकोला जिल्ह्यात पंतप्रधान पीकविमा योजना खरीप हंगाम २०२३ अंमलबजावणी करिता एचडीएफसी इर्गो कंपनीची नेमणूक करण्यात आली आहे.

खरीप ज्वारी, कापूस, तूर, उडीद, मूग, सोयाबीन या पिकांसाठी सर्व तालुके व सर्व महसूल मंडळांसाठी ही योजना लागू आहे. यामुळे पीकविमा योजनेमध्ये हवामान घटकांच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांची पेरणी किंवा लावणी न झाल्यामुळे होणारे नुकसान, पिकांच्या हंगामामध्ये हवामानातील प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे होणारे नुकसान,

पीक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत नैसर्गिक आग, वीज कोसळणे, गारपीट, वादळ, चक्रीवादळ, पूर, क्षेत्र जलमय होणे, भूस्खलन, दुष्काळ, पावसातील खंड, कीड व रोग इत्यादी बाबींमुळे उत्पन्नात येणारी घट, स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे होणारे नुकसान या बाबींचा समावेश आहे.

या योजनेत सन २०२३-२४ पासून शेतकऱ्यांना प्रति अर्ज केवळ एक रुपया भरून पोर्टलवर नोंदणी करता येईल. पीकविमा संरक्षण मिळविण्यासाठी ३१ जुलै २०२३ पूर्वी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अरोरा व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे यांनी केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Tree Plantation: नाशिकमध्ये एक लाख वृक्ष लागवडीचा संकल्प

Power Supply Issue: वीज कपातीमुळे पिके धोक्यात; संतप्त शेतकऱ्यांचा महावितरणवर धडक मोर्चा

Farm Loan Waiver: कर्जमाफीसाठी ॲग्रीस्टॅक नोंदणी आवश्यक

Crop Damage Compensation: कोकणातील १ लाख ३४ हजार शेतकऱ्यांना दिलासा; २०९ कोटी मदत मंजूर, शासन निर्णय जारी

Nashik Rain Update: नाशिक जिल्ह्यात सर्वदूर पावसाची हजेरी

SCROLL FOR NEXT